Malad Bank Theft : बँक फोडली, पण कॅश लॉकरपर्यंत पोहोचण्याआधीच पकडला; मालाडमध्ये २४ तासांत आरोपीला बेड्या

मुंबई : मालाडच्या एव्हरशाईन नगर परिसरातील एका बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली असून, बांगूर नगर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. प्रदीप रामचंद्र माने असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने बँकेचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कॅश लॉकरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना त्याने बँकेतील सर्व्हरशी संबंधित वायरिंग आणि सेन्सर्सचे नुकसान केले. मात्र, कॅश लॉकरपर्यंत पोहोचण्यात त्याला यश आले नाही.



ही घटना २० ऑगस्टच्या सायंकाळपासून २१ ऑगस्टच्या सकाळपर्यंतच्या कालावधीत घडल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी बँकेचे कर्मचारी शाखेत पोहोचले असता त्यांना काहीतरी संशयास्पद आढळून आले. बँकेतील दिवे सुरू होते, तर कॅश रूमच्या दरवाजाशी छेडछाड झाल्याचे निदर्शनास आले. तपासणीदरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना नुकसान झाल्याचेही आढळले. तसेच बँकेतील काही ड्रॉवर उघडलेले दिसून आले. त्यामुळे बँकेत चोरीचा प्रयत्न झाल्याचा संशय कर्मचाऱ्यांना आला आणि त्यांनी तातडीने बांगूर नगर पोलिसांना माहिती दिली.



घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. परिसरातील उपलब्ध तांत्रिक पुरावे आणि इतर माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध घेतला. अखेर २४ तासांच्या आत प्रदीप माने याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांच्या चौकशीत बँकेत चोरी करण्याच्या उद्देशाने प्रवेश केल्याचे आरोपीने सांगितल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात आरोपीच्या पूर्वइतिहासाचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, बँकेत दिवसा सुरक्षा रक्षक तैनात असला तरी रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बँकेच्या रात्रीच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेनंतर बांगूर नगर पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपीने यापूर्वी अशाच प्रकारच्या घटनांमध्ये सहभाग घेतला होता का, याचीही पडताळणी केली जात आहे.

Comments
Add Comment

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी