Kriti Sanon Raksha Bandhan Ad : ट्रोलिंगचा दणका! क्रिती सेननला बसला मोठा धक्का; वादानंतर ब्रँडने जाहिरातच घेतली मागे

Kriti Sanon Raksha Bandhan Ad  : अभिनेत्री क्रिती सेनन रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली होती. तिच्या इंडो-वेस्टर्न लूकवरून नेटिझन्सनी नाराजी व्यक्त केली होती. काही युजर्सनी रक्षाबंधनाच्या जाहिरातीत भावासमोर अशा पोशाखात जाण्यावरून क्रितीला लक्ष्य केले होते. या ट्रोलिंगला क्रितीनेही सोशल मीडियावर सडेतोड उत्तर दिले होते. मात्र, आता या जाहिरातीवरून क्रितीला मोठा धक्का बसला आहे.



क्रितीने ट्रोलर्सना दिलं होतं उत्तर


रक्षाबंधनाच्या जाहिरातीत क्रितीने इंडो-वेस्टर्न पोशाख परिधान केला होता. या लूकवरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यानंतर क्रितीने पोस्ट करत म्हटलं होतं की, सणांचं खरं महत्त्व कपड्यांमध्ये नसून त्या परंपरांशी जोडलेल्या भावना आणि त्यामागील अर्थामध्ये आहे.


मात्र, आता जाहिरात ज्या ‘जिवा’ ब्रँडची होती, त्या ब्रँडनेच ती जाहिरात मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.



‘जिवा’ने जाहिरात घेतली मागे


ब्रँडने सोशल मीडिया पोस्टद्वारे स्पष्टीकरण देताना भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांविषयी आदर असल्याचे म्हटले आहे. अलीकडील जाहिरातीमुळे समाजातील काही घटकांच्या भावना अनवधानाने दुखावल्या असतील, तर तसा आपला हेतू नव्हता, असे ब्रँडने स्पष्ट केले.


तसेच, आदर व्यक्त करण्याच्या भावनेतून ही जाहिरात सर्व माध्यमांमधून मागे घेत असल्याचे ब्रँडने सांगितले आहे.


त्यामुळे क्रिती सेनन ज्या रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे चर्चेत आली होती, तो जाहिरातीचा व्हिडीओ आता ब्रँडने हटवला आहे. जाहिरात मागे घेतल्यानंतर सोशल मीडियावर याबाबत पुन्हा चर्चा रंगली आहे.

Comments
Add Comment

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’

Drishyam : ‘दृश्यम 3' चा बॉक्स ऑफिसवर जलवा ! आता 'दृश्यम 4’ येणार ? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं...

Drishyam 3 : अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपट मालिकेने प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. रहस्य, थरार