Kriti Sanon Controversy : कृती सेनॉनच्या राखीच्या जाहिरातीने घेतलं राजकीय वळण; राहुल गांधींच्या समर्थनानंतर कंगना रणौतचा टोला

मुंबई : अभिनेत्री कृती सेनॉनच्या राखीच्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आता राजकीय वळणावर पोहोचला आहे. जाहिरातीवरून झालेल्या टीकेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कृतीच्या भूमिकेला पाठिंबा दिला. त्यानंतर भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतने राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.


कृतीच्या जाहिरातीवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी महिलांना त्यांच्या कपड्यांवरून आणि निवडीवरून ट्रोल करू नये, असे म्हटले. “एक स्त्री काय घालते, ती काय करते आणि कुठे जाते, हा तिचा वैयक्तिक निर्णय आहे,” असे म्हणत त्यांनी #SmashThePatriarchy हा हॅशटॅग वापरला.


यानंतर कंगना रणौतने भाजपच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील राहुल गांधींवरील टीकात्मक पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली. त्यासोबत तिने “भाऊ, थांब. भारत माता की जय. चला सुरुवात करूया,” असा टोला लगावला. भाजपच्या या पोस्टमध्ये महिला आरक्षण विधेयक, तिहेरी तलाक आणि कर्नाटक मंत्रिमंडळातील महिला प्रतिनिधित्वाचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. (Kriti Sanon Controversy)



वाद नेमका कशावरून झाला ?


एका ज्वेलरी ब्रँडच्या राखीच्या जाहिरातीत कृती सेनॉन ब्रॅलेट ड्रेसमध्ये दिसते. ती आपल्या भावाला राखी बांधण्यापूर्वी कुत्र्याला राखी बांधताना दाखवण्यात आली आहे. यावर काही सोशल मीडिया यूजर्सनी तिच्या पोशाखासह जाहिरातीतील आशयावर आक्षेप घेतला. कंगना रणौतने यापूर्वीही जाहिरातीवर टीका करत, “जेव्हा कपड्यांचे इतके पर्याय आहेत, तेव्हा भावाला बिकिनी किंवा अंतर्वस्त्रांमध्ये राखी का बांधाल?” असा सवाल केला होता.



कृती सेनॉनचे प्रत्युत्तर


कृतीने या टीकेला उत्तर देताना रक्षाबंधनाचा अर्थ कपड्यांपेक्षा भावना आणि नात्यातील प्रेमात असल्याचे म्हटले. तिच्या मते, भाऊ-बहिणीप्रमाणेच ती आणि तिची बहीण एकमेकींचे रक्षण करण्याचे वचन देतात आणि त्यांच्या कुत्र्यांनाही कुटुंबाचा भाग मानतात. तिने पुढे महिलांच्या कपड्यांवरून त्यांच्या संस्कृतीचा किंवा परंपरेचा आदर ठरवण्यावरही प्रश्न उपस्थित केला. संस्कृती आणि परंपरा ही मनात असते, कपड्यांच्या गळ्याच्या मापात नाही, असा मुद्दा तिने मांडला.


दरम्यान, राहुल गांधींच्या समर्थनानंतर कंगनाने केलेल्या टीकेमुळे हा जाहिरातीचा वाद आता महिलांचे स्वातंत्र्य, पोशाख आणि राजकीय भूमिकांवरील चर्चेत बदलला आहे. (Kriti Sanon Controversy)

Comments
Add Comment

Gmail Storage : Google Photos आणि Gmail चे स्टोरेज फुल झाले? एकही रुपया खर्च न करता अशी रिकामी करा जागा

Gmail Storage: प्रत्येक Google अकाउंटसोबत 15 GB मोफत स्टोरेज मिळते. मात्र, हे स्टोरेज Google Drive, Google Photos आणि Gmail या तिन्ही सेवांसाठी

Bhuvan Bam : भुवन बामच्या अडचणी वाढल्या! गुजरातमधील विद्यापीठातील कार्यक्रमात अश्लील कृती केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

Bhuvan Bam: प्रसिद्ध यूट्यूबर आणि कॉमेडियन भुवन बाम एका नव्या वादात अडकला आहे. गुजरातमधील वडोदरा येथील पारुल

BMC Health Policy : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य योजनांचा लाभ, नागरी आरोग्य धोरणाचा मसुदा सार्वजनिक आरोग्य समितीसमोर सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) BMC Health Policy : निरोगी मुंबई आणि भविष्यकालीन सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिकेने नागरी आरोग्य

Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी खुशखबर! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच जोडले जाणार, 67 टक्के काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला

Uttar Pradesh Viral video : हुंड्याच्या हव्यासापोटी मागितली थेट 'महिंद्रा थार'; वधूच्या कुटुंबीयांनी भरमांडवात दाखवला आरसा!

Uttar Pradesh Viral video: हुंड्याच्या मागणीला उत्तर देण्यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी अनोखी शक्कल लढवल्याची घटना उत्तर