Kon Honaar Crorepati : माधुरी दीक्षित आता ‘कोण होणार करोडपती’च्या हॉटसीटवर; सूत्रसंचालक म्हणून स्वीकारलेल्या नव्या भूमिकेबद्दल म्हणाली...

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीची 'धक धक गर्ल' अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आता एका नव्या आणि अनोख्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाली आहे. 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Karodpati) या छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा यंदा माधुरी दीक्षित सांभाळणार आहे. ही घोषणा झाल्यापासूनच तिच्या चाहत्यांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, सोशल मीडियावरही तिचीच चर्चा रंगली आहे.



माधुरीने का स्वीकारली ही नवी भूमिका ?




या कार्यक्रमाचा भाग होण्यामागचे सर्वात मुख्य आणि खास कारण सांगताना माधुरी दीक्षित म्हणाली, "माझ्यासाठी हा केवळ प्रश्नमंजुषा खेळ किंवा पैसे जिंकण्याचे माध्यम नाही. मला सर्वात जास्त उत्सुकता आहे ती म्हणजे या मंचावर येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाची कहाणी, त्यांचे विचार आणि त्यांची स्वप्ने जाणून घेण्याची. 'कोण होणार करोडपती' हा स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवून आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा देणारा एक सुंदर प्रवास आहे."



"अभिनेत्री म्हणून नाही, तर 'माधुरी' म्हणून जोडली जाईन"


आपल्या नृत्य आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या माधुरीने या शोमधील तिच्या भूमिकेवर अधिक भाष्य केले. ती म्हणाली, "चित्रपटांमध्ये काम करताना मी एखाद्या भूमिकेत असते, पण या कार्यक्रमात प्रेक्षकांना माझी अत्यंत सहज आणि खरी बाजू पाहायला मिळेल. इथे मी कोणतीही व्यक्तिरेखा न साकारता 'मी स्वतः' असणार आहे. स्पर्धकांशी मनमोकळ्या गप्पा मारणे, त्यांच्या सुख-दुःखाच्या कथा ऐकणे आणि त्यांच्या स्वप्नांचा भाग होणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मला लोकांशी संवाद साधायला खूप आवडतो, त्यामुळे हा खऱ्या भावनांनी भरलेला अनुभव घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे."



नोंदणी प्रक्रिया सुरू; 'सोनी मराठी' आणि 'Sony LIV' वर लवकरच आगमन


माधुरी दीक्षितच्या या नव्या प्रवासात सहभागी होण्यासाठी आणि 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर पोहोचण्यासाठी प्रेक्षकांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे नोंदणी कशी कराल ? : इच्छुक स्पर्धक Sony LIV ॲपवरून किंवा +91 85919 75331 या व्हॉट्सॲप (WhatsApp) क्रमांकावर संदेश पाठवून आपली नोंदणी करू शकतात. प्रत्येक स्पर्धकाचे स्वप्न, त्यांचा प्रवास आणि माधुरी दीक्षितचा खास अंदाज यामुळे 'कोण होणार करोडपती'चा हा आगामी भाग अत्यंत रंजक आणि खास ठरणार आहे. हा कार्यक्रम लवकरच 'सोनी मराठी' वाहिनीवर आणि 'Sony LIV' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे.

Comments
Add Comment

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’

Drishyam : ‘दृश्यम 3' चा बॉक्स ऑफिसवर जलवा ! आता 'दृश्यम 4’ येणार ? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं...

Drishyam 3 : अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपट मालिकेने प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. रहस्य, थरार