CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील नागरिकांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा देत गडचिरोलीच्या विकासाचा आढावा घेतला. “गडचिरोली आता माओवादमुक्त असून देशाचे ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येत आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले. (CM Devendra Fadnavis)


गडचिरोलीचे आपल्या मनात विशेष स्थान असल्याचे सांगत फडणवीस यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. २०१४पासून जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे परिणाम आता दिसत असून, जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक येत असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योग, शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या विकासामुळे गडचिरोलीसह लगतच्या परिसरातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (CM Devendra Fadnavis)



मेडिकल कॉलेज, विमानतळ आणि रेल्वे प्रकल्पांना वेग


गडचिरोलीमध्ये मेडिकल कॉलेज, विमानतळ, रेल्वेमार्ग, रस्ते आणि शिक्षणाच्या सुविधा यांसह विविध क्षेत्रांत विकासकामे वेगाने सुरू असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. मात्र, विकास करताना जल, जमीन, जंगल आणि पर्यावरणाच्या संवर्धनालाही समान महत्त्व दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गडचिरोलीच्या विकास प्रक्रियेत जिल्ह्यातील नागरिकांनी दिलेल्या सहकार्याचे श्रेय त्यांना देत, पुढील काळातही नागरिकांच्या सहकार्याने जिल्ह्याच्या विकासात आणखी भर घालण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. (CM Devendra Fadnavis)


“माओवादाची ओळख पुसून विकासाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गडचिरोलीला आता उद्योग आणि रोजगाराचे नवे केंद्र बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे,” असा संदेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्यातून देण्यात आला. (CM Devendra Fadnavis)

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी