Sonu Nigam : कृती सेनॉनच्या राखी जाहिरातीवरून गायक सोनू निगमची सणसणीत ट्विटर पोस्ट, म्हणाला...

मुंबई : अभिनेत्री कृती सेनॉनच्या राखीच्या जाहिरातीवरून सुरू असलेल्या वादात आता गायक सोनू निगमने (Sonu Nigam) भूमिका मांडली आहे. सोनू निगमने ट्विटर (X) पोस्टद्वारे या जाहिरातीवर टीका करत म्हटलं, "हा मुद्दा महिलांनी काय परिधान करावे याचा नसून, दुहेरी निकष आणि हिंदू सणांच्या परंपरांशी संबंधित संवेदनशीलतेचा असल्याचे आहे". (Sonu Nigam)


सोनू निगमने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, “महिलांनी काय घालावे, हा वादाचा मुद्दा नाही. दिक्कत दुहेरीपणाशी आहे,” असे म्हणत सोनू निगमने हिंदू सणांच्या जाहिरातींमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचा विचार करण्याची गरज व्यक्त केली.


यासाठी त्यांनी गुरुद्वारात डोके झाकण्याची परंपरा तसेच काही मंदिरांमध्ये विशिष्ट पोशाखाबाबत असलेल्या नियमांचा दाखला दिला. “कधी काय घालावे, याचेही एक शिष्टाचार असतात,” अशी भूमिका त्याने या पोस्टद्वारे मांडली.



हिंदू समाजाच्या धार्मिक भावनांचा वारंवार विचार न करता केवळ ‘महिलांच्या स्वातंत्र्या’चा मुद्दा पुढे करणे योग्य नसल्याचेही सोनू निगमने म्हटले. “विक्टिम कार्ड खेलने की जगह लोकतांत्रिक देश में हिंदुओं की आस्था पर कुठाराघात करना बंद करें,” असे म्हणत सोनू निगमने हिंदू समाजाच्या धार्मिक भावनांचा आदर करणे महत्वाचे असल्याचे सांगितले. “हिंदू सहनशील आहे, याचा अर्थ त्याच्या संयमाची वारंवार परीक्षा घ्यावी असा नाही,” असेही त्याने नमूद केले.






 

दरम्यान, सोनू निगमने आपल्या पोस्टच्या शेवटी, जाहिरात हटवल्याबद्दल GIVAचे आभारही व्यक्त केले आहेत.


कृती सेनॉनच्या राखीच्या जाहिरातीवरून यापूर्वी सोशल मीडियावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. काहींनी जाहिरातीतील पोशाख आणि मांडणीवर आक्षेप घेतला, तर काहींनी महिलांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा मध्ये आणत कपड्यांवरून होणाऱ्या टीकेला विरोध केला. एकंदरच या प्रकरणाने असंख्य दृष्टिकोन समोर आणत महिला स्वातंत्र्य, धार्मिक परंपरा आणि जाहिरातींमधील सांस्कृतिक संवेदनशीलता यांसारखे प्रश्न चर्चेत आणले आहेत.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’