Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून ९ आणि ११ सप्टेंबरला धावणार 'मोदी एक्सप्रेस'

- गणेश भक्तांच्या सेवेसाठी गेल्या १४ वर्षांपासून उपक्रम; दादर रेल्वे स्थानकातून रेल्वे होणार मार्गस्थ


मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात कोकणवासीयांना आपल्या गावी पोहोचता यावे, यासाठी सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही 'मोदी एक्सप्रेस' ही विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. मागील चौदा वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या या उपक्रमामुळे मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांचा गावी जाण्याचा प्रवास अधिक सुकर होणार असून, येत्या ९ आणि ११ सप्टेंबरला दादर रेल्वे स्थानकातून ही गाडी कोकणाकडे मार्गस्थ होईल. (Modi Express)


याविषयी माहिती देताना मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, गेल्या १४ वर्षांपासून गणेशोत्सवानिमित्त ही मोदी एक्सप्रेस धावत आहे. दरवर्षी प्रवाशांना सोडण्यासाठी ट्रेनमध्ये उपस्थित राहताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान पाहून मनापासून आनंद होतो आणि त्यांचे भरभरून आशीर्वादही लाभतात. याही वर्षी सप्टेंबर महिन्याच्या ९ आणि ११ तारखेला दादरच्या फलाट क्रमांक १४ वरून सकाळी १०:३० वाजता हक्काची मोदी एक्सप्रेस प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी सज्ज झाली आहे. (Modi Express)



ही मोदी एक्सप्रेस मुंबईतून निघाल्यानंतर रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली असा प्रवास करत सावंतवाडी हे तिचे अंतिम ठिकाण असेल. नेहमीप्रमाणे याही वर्षी मोदी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांसाठी खाण्या-पिण्याची सोय आणि पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Modi Express)



तिकीट कुठे बुकिंग कराल?


- तिकीट बुकिंगबाबत माहिती देताना मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, नेहमीप्रमाणे कणकवली, देवगड आणि वैभववाडी येथील भारतीय जनता पक्षाच्या मंडळ अध्यक्षांकडे तिकीट बुकिंगसाठी संपर्क साधावा. तसेच रत्नागिरी हा थांबा असल्याने तेथील भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्याशी संपर्क साधून तिकीट बुक करावे.
- तिकीट बुकिंगसाठी २ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे, जेणेकरून येत्या ९ आणि ११ तारखेला सर्वजण आपल्या गावाकडे रवाना होऊ शकतील.

Comments
Add Comment

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने