Navnath Ban : MPSC पेपरफुटी प्रकरणावरून नवनाथ बन यांचा रोहित पवारांवर निशाणा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणावरून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणातील आरोपी सुनील गाढवे यांच्याशी रोहित पवारांचे नेमके काय संबंध आहेत, याचा खुलासा त्यांनी करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली.


भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नवनाथ बन यांनी रोहित पवार आणि सुनील गाढवे यांची एकत्रित छायाचित्रे पत्रकारांसमोर सादर केली. यामध्ये शरद पवार यांच्यासोबतच्या काही छायाचित्रांचाही समावेश असल्याचा दावा त्यांनी केला. (Navnath Ban)



‘गाढवे रोहित पवारांच्या जवळचे’ असा दावा


सुनील गाढवे हे रोहित पवारांच्या अत्यंत जवळचे असून पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध प्रकरणांमध्ये दोघांनी एकत्र काम केल्याचा दावा बन यांनी केला. पुण्यातील रोहित पवारांची अनेक कामे गाढवे पाहत असल्याचेही त्यांनी म्हटले.



“सुनील गाढवे आणि रोहित पवार यांचे संबंध नेमके काय आहेत? त्यांची ओळख किती वर्षांपासून आहे, कोणामार्फत झाली आणि पुण्यात गाढवेंनी रोहित पवारांसाठी कोणती कामे केली? MPSC आंदोलनातील गाढवेंची भूमिका काय होती?” असे प्रश्न उपस्थित करत बन यांनी रोहित पवारांकडून स्पष्टीकरणाची मागणी केली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सुमारे सहा आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू असल्याचेही बन यांनी सांगितले.


सुनील गाढवे हे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांचे पीए होते, असा आरोप केला जात असल्याचा उल्लेख करत बन यांनी हा दावा फेटाळला. अभिमन्यू पवार यांच्याशी स्वतः चर्चा केली असून, गाढवेंना त्यांनी कधीही पीए म्हणून नियुक्त केले नव्हते, असे बन यांनी स्पष्ट केले. MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलेल्या विविध शिष्टमंडळांमध्ये गाढवे सहभागी झाले होते, मात्र ते अभिमन्यू पवारांचे पीए नव्हते, असा दावा त्यांनी केला. (Navnath Ban)



संजय राऊतांवरही नवनाथ बन यांची टीका


दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अमेरिका दौऱ्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरही बन यांनी प्रतिक्रिया दिली. अमेरिका आणि भारतात विचारस्वातंत्र्य असल्याचे सांगत त्यांनी राऊतांवर टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन सरकारच्या काळातील काही घटनांचा संदर्भ देत बन यांनी “भारतामध्ये विचारस्वातंत्र्य नसते तर संजय राऊत यांना दररोज वक्तव्य करता आले नसते,” असा टोला लगावला. तसेच राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह पाकिस्तानात जाऊन भाषण करावे, अशी टीकाही त्यांनी केली.

Comments
Add Comment

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न