Minister Girish Mahajan : महाराष्ट्रातील ८० हून अधिक पर्यटक नेपाळमध्ये अडकले, चौघांशी संपर्क - मंत्री गिरीश महाजन

Minister Girish Mahajan : नेपाळमध्ये आलेल्या महापुरात (Flood Flash) अडकलेल्या राज्यातील पर्यटकांच्या (Tourist) शोधासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या माध्यमातून नेपाळ सरकारच्या संपर्कात आहे, अशी माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आज दिली. (Nashik News)



पर्यटकांच्या शोधासाठी नेपाळ सरकारच्या संपर्कात


पत्रकारांशी बोलताना मंत्री महाजन म्हणाले, नेपाळ तिबेटमध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडली असून तिथे महापूर आला असून भूस्खलन झालं या विदारक परिस्थितीमध्ये अनेक लोक वाहून गेले. मानस सरोवरला अनेक पर्यटक जातात, रिचा ट्रॅव्हलच्या माध्यमातून 2 बस तिकडे गेल्या होत्या माझ्या बाजूचे लोकं सुद्धा गेले होते पहिल्या दिवशी संपर्क झाला नव्हता आता झाला आहे मात्र अजूनही अनेकांशी संपर्क अजूनही होत नाही. फोनवर संपर्क करतोय पण अडचणी येत आहे. सोबतच कोण कोण फिरायला गेले याची माहिती गोळा करतोय. वेबसाईटवर अनेक जण माहिती देतात, दिल्लीशी आपण सतत संपर्कात आहोत. (Nashik News)



राज्यातील पर्यटक दोन बसमधून तेथे गेले आहेत. या बस रिचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या आहेत. ४५ जणांचे दोन गट आहेत. यातील चार जणांशी संपर्क झाला असून, इतरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः केंद्र सरकारच्या संपर्कात आहेत. भूस्खलनामुळे तेथील नेटवर्क यंत्रणा कोलमडली आहे. प्रशासनाचा चार जणांशी संपर्क झाला असून, त्यांच्या माध्यमातून अनेक पर्यटक सुरक्षित असल्याचे कळाले आहे. नागरिक किंवा नातेवाईकांकडे या भागात गेलेल्या पर्यटकांची माहिती असल्यास त्यांनी ती जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा शासकीय पोर्टलवर द्यावी. २४ तास नियंत्रण कक्ष आणि संकेतस्थळ सुरू असून, राज्य सरकार केंद्र सरकार आणि नेपाळ प्रशासनाच्या सतत संपर्कात असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले. (Nashik News)



कुंभ सर्वांचा आहे रुसवेफुगवे नको


यावेळी मंत्री महाजन कुंभमेळ्याविषयी देखील भाष्य केले. नगरसेवक नाराज असल्याच्या चर्चांवर मंत्री महाजन म्हणाले की, थोडं प्रेझेंटेशन द्यायचे होते, म्हणून बैठक बोलावली होती. दुसऱ्या बैठका लांबल्यामुळे कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह (Kumbh Mela Commissioner Shekhar Singh) उशिरा गेले. काही लोक भेटले, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. झाली ती चूक झाली कुंभ सर्वांचा आहे रुसवेफुगवे नको असे ते म्हणाले. तर उद्या नाशिकमध्ये मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा आहे यावर देखील त्यांनी भाष्य केले. mvp, कुंभ, कृषी आणि विद्यापीठ कार्यक्रम होणार आहे हे सर्व भरगच्च कार्यक्रम असणार आहे कुंभाची कामे व्यवस्थित सुरु आहे काम चांगले होतील. असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

Nashik News : समृध्दी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना, लुटीच्या घटनांनंतर पोलीस सतर्क

Nashik News : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या

NCP Core Committee Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची देवगिरी येथे महत्त्वपूर्ण बैठक; संघटनात्मक बांधणीवर चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पार

Ashok Kharat Case : पीडित स्त्रियांवर...अशोक खरातच्या आज सुनावणीत न्यायालयात काय घडलं ?

Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सर्वानाच हादरवून सोडले होते. भविष्य सांगण्याचा बहाणा करत भोंदू

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच