Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव


मुंबई, २७: मुंबईत सध्या 'प्रो गोविंदा सीझन ४' चा महाअंतिम सोहळा अत्यंत उत्साहात आणि रोमहर्षक वातावरणात पार पडत आहे. या स्पर्धेत अंतिम फेरीतील १६ संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत असून शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला ७५ लाख रुपयांचा धनादेश आणि मानाचा चषक देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, प्रो गोविंदा सीझन ४ चे ब्रँड ॲम्बेसेडर सूर्यकुमार यादव आणि प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येत आहे. यासोबतच स्पर्धेतील उपविजेत्या द्वितीय क्रमांकाच्या संघाला ५० लाख रुपये, तृतीय क्रमांकाच्या संघाला २५ लाख रुपये तर उर्वरित सर्व सहभागी संघांना प्रत्येकी ३ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येत आहे. (Pro Govinda Season 4)



याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, दहीहंडी हा खेळ मातीपासून मॅटपर्यंत आणि थेट स्पेनपर्यंत पोहोचला आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. हा खेळ पुढे कॉमनवेल्थ आणि ऑलिम्पिक स्पर्धेत घेऊन जाण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे पाठीशी उभे राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच कबड्डीप्रमाणे इयत्ता ८ वी नंतर शालेय पीटीच्या तासात गोविंदांचा सराव शिकवला जावा यासाठी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगत, हा खेळ सातासमुद्रापार नेण्यासाठी आणि प्रो गोविंदा स्पर्धेच्या पाठीशी आपण सदैव उभे राहू असा शब्द त्यांनी दिला.


कार्यक्रमाचे ब्रँड ॲम्बेसेडर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांनी गोविंदांचे कौतुक करत सांगितले की, मातीपासून मॅटपर्यंतचा गोविंदांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. गोविंदांचे संघ कौशल्य, जिद्द, मेहनत आणि अचूक टायमिंग थक्क करणारे असून थरावर थर रचणे सोपे नाही, त्यामुळे सर्व गोविंदांच्या जिद्दीला आणि समर्पणाला सलाम. प्रो गोविंदा लीगचे संस्थापक तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी आपण पाहिलेले स्वप्न पुर्वेश सरनाईक आणि त्यांच्या टीमने सत्यात उतरवल्याबद्दल आनंद व्यक्त करत सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. तर प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी गोविंदांच्या अद्भूत संघटन कौशल्याचा गौरव करत हा खेळ ऑलिम्पिकमध्ये नेण्यासाठी आवश्यक ते सर्व परिश्रम घेणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. या दिमाखदार सोहळ्यास प्रो गोविंदा लीगच्या संचालिका कश्मीरा सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी