Pune News : 'MH 12' ची जागा आता 'MH 61' ने घेतली; व्हीआयपी नंबरसाठी पुणेकरांची तुफान गर्दी  

पुणे: पुणेकरांच्या अस्मितेचा आणि जिव्हाळ्याचा विषय असलेली 'MH 12' वाहन नोंदणी मालिका संपल्यानंतर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (RTO) अधिकृतपणे 'MH 61' ही नवीन मालिका सुरू करण्यात आली आहे. नवीन मालिकेच्या आगमनासह पुणेकरांमध्ये व्हीआयपी आणि पसंतीच्या क्रमांकासाठी मोठी क्रेझ पाहायला मिळत असून, पहिल्याच टप्प्यात हजारो अर्ज दाखल झाले आहेत.



'MH 61 A' मालिकेसाठी तुफान प्रतिसाद


पुणे आरटीओने चारचाकी वाहनांसाठी 'MH 61 A' मालिका खुली केली असून, या मालिकेतील आकर्षक व पसंतीचे क्रमांक मिळवण्यासाठी १ हजार १८ हून अधिक वाहनधारकांनी अर्ज केले आहेत. एकाच क्रमांकासाठी अनेक दावेदार समोर आल्याने आरटीओच्या माध्यमातून होणाऱ्या लिलावातून प्रशासनाला मोठा महसूल मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.



कोणत्या क्रमांकासाठी सर्वाधिक चढाओढ?


पुणेकरांचा वाढदिवस, लकी नंबर किंवा सहज लक्षात राहणाऱ्या आकर्षक क्रमांकांकडे मोठा कल असल्याचे अर्जांवरून स्पष्ट होते:




  • ९१ नंबर ठरला फेव्हरेट: 'MH 61 A' मालिकेतील ९१ या क्रमांकासाठी तब्बल ९ अर्ज आले असून हा सर्वाधिक मागणी असलेला नंबर ठरला आहे.

  • इतर पसंतीचे क्रमांक: २४, २७, २४२४, ६१६१ आणि ९९०९ या पाच लोकप्रिय क्रमांकांसाठी प्रत्येकी ८ अर्ज प्राप्त झाले आहेत.

  • एक अंकी व व्हीआयपी नंबर: '५' या एकाकी आकड्यासाठी ७ अर्ज आले आहेत, तर २३, ५५५ आणि २४९८ या क्रमांकासाठी प्रत्येकी ६ जणांनी दावा सांगितला आहे. याशिवाय ६, १०, ५१५१, ६९९९, ७०७० आणि ६६६६ यांसारख्या क्रमांकांनाही संख्येनं मोठी पसंती मिळाली आहे.



दुचाकींच्या लिलावाचे वेळापत्रक जाहीर


चारचाकी वाहनांच्या अभूतपूर्व प्रतिसादामनंत आता आरटीओने दुचाकी वाहनांसाठी 'MH 61' मालिका खुली केली आहे. दुचाकींच्या पसंती क्रमांकासाठी ३० ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० ते दुपारी २:३० वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. यानंतर इच्छुकांना ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ३:१५ वाजेपर्यंत डिमांड ड्राफ्ट (DD) जमा करावा लागेल, तर ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ४:०० वाजता पसंतीच्या क्रमांकांचा थेट लिलाव पार पडणार आहे. पारंपरिक 'MH 12' मालिका संपल्यानंतर नव्या 'MH 61' ने पुणे वाहन बाजारात जोरदार एंट्री केली असून, वाहन खरेदीदारांचा हा उत्साह आगामी काळातही कायम राहण्याची चिन्हे आहेत.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी