Bandhu Marathi Film : ‘बंधू’ चित्रपटातून अभिनेता रजत बेदीची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री; म्हणाला, "कथानकाने माझं लक्ष्य वेधलं"

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रजत बेदी (Rajat Bedi) आता 'बंधू' या मराठी चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीचा विस्तार आणखी वाढवण्यासाठी सज्ज झाला आहे. मराठी चित्रपटाच्या निर्मितीला होकार देण्यामागचं कारण सांगताना रजत बेदी म्हणाला की, 'बंधू' चित्रपटाची कथा सर्वांना आपलीशी वाटणारी असून, ती कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या हृदयाला स्पर्श करणारी आहे. (Bandhu Marathi Film)


रजत म्हणाला, “मला कथेबद्दल जास्त बोलायला आवडणार नाही, पण दिग्दर्शकाने ज्या सुंदर पद्धतीने दोन कथा एकत्र गुंफल्या आहेत, ती गोष्ट मला खरोखरच भावली. मुळात, ही एक अशी कथा आहे जी सर्व कुटुंबांसाठी वैश्विक आहे, कारण चित्रपटात आम्ही ज्या समस्येवर चर्चा करत आहोत. ज्या प्रकारे ही कथा अखेरीस कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या हृदयाला स्पर्श करते, ते खूप सुंदर आहे.” रजतने पुढे असेही व्यक्त केले की, 'बंधू' सारख्या प्रकल्पाशी जोडले गेल्याचा त्याला अभिमान आहे, मग तो चित्रपट तिकीट खिडकीवर कशी कामगिरी करतो याची मी फारशी पर्वा करत नाही.



“म्हणजे, हा माझ्या आयुष्यातील अशा चित्रपटांपैकी एक आहे, ज्याचा मला नेहमीच खूप अभिमान वाटेल. तो कसा चालेल हेही मला माहीत नाही; ते प्रेक्षकांच्या हातात आहे, पण मला या आशयाचा प्रचंड अभिमान आहे,” असंही त्याने नमूद केलं. रजत महाराष्ट्रात वाढला असल्यामुळे, ही कथा त्याच्यासाठी खास आहे. आपल्या शालेय जीवनात मराठी किती महत्त्वाची होती हे आठवून रजत म्हणाला, “मी महाराष्ट्रात वाढलो आहे. माझा जन्म महाराष्ट्रात झाला आहे आणि आज मी एक मराठी चित्रपट सादर करत आहे याचा मला खूप अभिमान वाटतो. मी जमनाबाई नरसी शाळेत होतो आणि माझी तिसरी भाषा मराठी होती. मला मराठी समजते आणि मी थोडीफार मराठी बोलूही शकतो. त्यामुळे या भाषेत काहीतरी करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.” (Bandhu Marathi Film)


रजत बेदी आणि जेएसडी स्टुडिओ द्वारा, ट्रायफ्लिक्स एंटरटेनमेंटच्या सहयोगाने सादर झालेल्या 'बंधू' या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी केले आहे. प्रणव देसाई, जुही देसाई आणि कुलदीप सुनील ओझा यांच्या संयुक्त निर्मितीचा 'बंधू' हा चित्रपट २० नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Bandhu Marathi Film)

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’