Ahilyangar Crime : ‘पैसे अन् सोनं सिद्ध करून देतो’ म्हणत महिलेची 45 हजारांची फसवणूक, भोंदू साधू गजाआड

Ahilyangar Crime :पैसे आणि सोन्याची अंगठी सिद्ध करून देतो’, असा बहाणा करत महिला व्यापाऱ्याची तब्बल 45 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांना राहाता पोलिसांनी तत्परतेने ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, फसवणुकीनंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन्ही आरोपींना कोपरगाव रेल्वे स्टेशन (Kopargaon Railway Station) परिसरातून पोलिसांनी पकडले. (Rahata Crime News)



नेमकं काय घडलं ?


राहाता शहरातील नगर-मनमाड रोडवर (Nagar-Manmad Road) साई दर्शन टॉवरमध्ये इशिता गिफ्ट गॅलरी (Ishita Gift Gallery) नावाचे दुकान आहे. बुधवारी दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास महिला व्यापारी दुकानात एकट्याच होत्या. त्याचवेळी भगवे कपडे परिधान केलेले दोन हिंदी भाषिक इसम दुकानात आले. सुरुवातीला महिलेने त्यांना 10 रुपये दक्षिणा दिली. मात्र, त्यानंतर या दोघांनी महिलेला आपल्या बोलण्यात गुंतवण्यास सुरुवात केली. गल्ल्यातील पैसे ‘सिद्ध करून देतो’, असा बहाणा करत त्यांनी महिलेला काउंटरबाहेर पैसे आणण्यास सांगितले. महिलेने गल्ल्यातील 5 हजार रुपये रोख रक्कम बाहेर काढल्यानंतर या भामट्यांनी हातचलाखीने ती रक्कम स्वतःच्या झोळीत टाकली. (Rahata Crime News)



फसवणूक झाल्याचे लक्षात येताच...


यानंतर त्यांची नजर महिलेच्या हातातील सोन्याच्या अंगठीकडे गेली. या अंगठीत पुष्कराज खडा असून तिचे वजन 6 ग्रॅम आणि किंमत तब्बल 40 हजार रुपये होती. ही अंगठीही ‘सिद्ध करून देतो’, असे सांगत त्यांनी महिलेच्या हातातून काढून घेतली. पैसे आणि अंगठी हातात पडल्यानंतर दोन्ही भामट्यांनी तेथून पोबारा केला. काही वेळाने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. यानंतर महिलेने गुरुवारी राहाता पोलीस ठाण्यात (Rahata Police Station) धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 318(4) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणी प्रथम खबर क्रमांक 0345/2026 नोंदवण्यात आला आहे. (Rahata Crime News)



भोंदू साधू कोपरगावात गजाआड


फसवणुकीची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. कोपरगाव पोलीस ठाण्याचे (Kopargaon Police Station) पोलीस हवालदार बाळासाहेब जरे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींचे फोटोच्या आधारे शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे कोपरगाव रेल्वे स्टेशन (Kopargaon Railway Station) परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. अखेर दोन्ही आरोपींना रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. हेडकॉन्स्टेबल अभंग या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Drug Free Maharashtra : महाराष्ट्र ड्रग्जमुक्त करण्यासाठी २०२९ची डेडलाईन

- नव्या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी; ग्रामपातळीपासून मंत्रालयापर्यंत जबाबदाऱ्यांचे वाटप मुंबई : नक्षलमुक्त

Crime news marathi : क्षुल्लक कारणावरून मुलाने आईच्या तोंडावर मारले कडे, ओठाला पडले ८ टाके; दुसीरीकडे व्यसनी मुलाचा बापाकडून खून

पुणे : पुणे शहरात कौटुंबिक वादातून होणारे गुन्हे आणि हिंसाचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. कौटुंबिक

MCA Captaincy : सिद्धेश लाड कडे मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईला सलग दुसऱ्या रणजी करंडक हंगामासाठी नवीन कर्णधार मिळणार आहे. अनुभवी फलंदाज सिद्धेश लाड २०२६-२७ च्या

Ola S1Z Electric Scooter भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि रेंज

मुंबई : इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी Ola Electricने नवीन Ola S1Z इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ४ लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळली, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

Ahilyanagar : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत अर्थात एसआयआर पडताळणीत जिल्ह्यातील तब्बल ४ लाख २६ हजार

POCSO arrest Shahapur : ठाण्याच्या शहापूर आदिवासी शाळेत २२ विद्यार्थिनींचा विनयभंग; पोक्सो कायद्यांतर्गत नराधम मदतनीसाला अटक

Thane : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एका शासकीय आदिवासी निवासी