Bank Holidays in September : सप्टेंबरमध्ये १२ दिवस बँका बंद! जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

मुंबई : सप्टेंबर महिन्यात बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे असतील, तर ती आधीच पूर्ण करून घेणे ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. विविध सण, नियमित साप्ताहिक सुट्ट्या आणि बँक कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपामुळे सप्टेंबरमध्ये देशभरातील बँकांच्या शाखा एकूण १२ दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. (Bank Holidays in September)


यामध्ये बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी पुकारलेल्या चार दिवसांच्या देशव्यापी संपाचा समावेश आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) ११ सप्टेंबर रोजी एक दिवसाचा, तर २८, २९ आणि ३० सप्टेंबर रोजी सलग तीन दिवसांचा संप जाहीर केला आहे. (Bank Holidays in September)


बँक कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यात पाच दिवस कामकाजाची पद्धत लागू करावी, तसेच सर्व बँकांमध्ये परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह करार समान पद्धतीने लागू करावेत, अशा प्रमुख मागण्या आहेत.



याशिवाय सप्टेंबरमध्ये सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळेही बँकांच्या शाखा बंद राहतील. ४ सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्माष्टमी, तर १४ सप्टेंबरला गणेश चतुर्थी, विनायक चतुर्थी आणि हरतालिका यामुळे संबंधित राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असेल. तसेच ६, १२, १३, २०, २६ आणि २७ सप्टेंबर रोजी रविवार आणि दुसरा-चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.


दरम्यान, शाखा बंद असल्या तरी ग्राहकांना डिजिटल बँकिंग सेवांचा वापर करता येणार आहे. ATM, UPI, इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सेवा सामान्यपणे उपलब्ध राहण्याची अपेक्षा आहे. मात्र, रोख रक्कम जमा करणे-काढणे, चेक जमा करणे किंवा बँकेतील प्रत्यक्ष कामांसाठी ग्राहकांनी सुट्ट्यांचे नियोजन लक्षात घेणे आवश्यक आहे. (Bank Holidays in September)

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि