CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ५० ई-बसेसचे लोकार्पण, कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

नाशिक : नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक, पर्यावरणपूरक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत ५० ई-बसेसचे नाशिककरांच्या सेवेत दाखल होत आहेत. या बसेसच्या माध्यमातून नागरिकांना विश्वासार्ह व दर्जेदार प्रवासाची सुविधा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नाशिक शहरासाठी दाखल झालेल्या ५० ई-बसेसचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी पालकमंत्री गिरीष महाजन, महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.



केंद्र शासनाच्या पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत नाशिक शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या १२ मीटर लांबीच्या ५० ई-बसेस शहरात दाखल झाल्या आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आधुनिक ई-बसेसचा समावेश झाल्यामुळे नागरिकांना विश्वासार्ह व दर्जेदार प्रवासाची सुविधा मिळणार आहे. तसेच सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढल्यास खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊन शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासही हातभार लागणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. डिझेल बसेसच्या तुलनेत ई-बसेसच्या वापरामुळे परिचालन खर्चातही बचत होणार आहे. नाशिक शहराचा विकास आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी भविष्यात आणखी बसेस उपलब्ध होणार असून त्यातून नागरिकांना अधिक व्यापक आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.



कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन


नाशिक त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी या प्रदर्शनाची पाहणी केली. रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्स आणि नाशिक प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुदक्षिणा हॉलमधील डॉ. सुनंदा म.गोसावी आर्ट गॅलरीत आजपासून छायाचित्र प्रदर्शन सुरू झाले. ते ३० ऑगस्ट २०२६ पर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनात सिंहस्थ कुंभमेळ्यांतील दुर्मिळ, अप्रकाशित छायाचित्रे मांडण्यात आली आहेत. १९३२ पासूनच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ऐतिहासिक आठवणींचा अमूल्य ठेवा या छायाचित्रांमधून उलगडला आहे. बदलते नाशिक, साधू-संतांचे आखाडे, शाही स्नानाची परंपरा, भाविकांचा महासागर, धार्मिक विधी, तत्कालीन सामाजिक जीवन, कुंभमेळ्याचे बदलते स्वरूप या छायाचित्रांतून पाहावयास मिळणार आहे.



उदघाटन सोहळ्यास राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके, आमदार सरोज अहिरे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महंत भक्ती चरणदास महाराज यांच्यासह रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्सचे अध्यक्ष अभय नेरकर, सचिव हर्षद बेळे, कार्यकारी सचिव अभिषेक व्यास, नाशिक प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष सतीश काळे, सचिव प्रशांत खरोटे, सतीश देवगिरे, अशोक गवळी, नीलेश तांबे, अंबादास शिंदे, हेमंत घोरपडे, विवेक बोकील, भूषण पाटील आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक उपस्थित होते.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या