Karnataka teachers suspended : RSS च्या पथसंचालनात सहभाग घेणं पडलं महाग! कर्नाटकातील २ सरकारी शिक्षकांवर निलंबनाची मोठी कारवाई

कर्नाटक : कर्नाटकच्या यादगीर जिल्ह्यात शिक्षण विभागाने दोन सरकारी शिक्षकांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) 'पथ संचलन' म्हणजेच रूट मार्चमध्ये सहभागी झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. अण्णासाहेब देशमुख आणि गुरुराज जोशी अशी या निलंबित शिक्षकांची नावे आहेत. 'कर्नाटक नागरी सेवा नियमांचे' उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत यादगीरच्या शिक्षण उपसंचालकांनी (DDPI) ही कारवाई केली आहे.



काय आहे हे संपूर्ण प्रकरण ?



निलंबित झालेले अण्णासाहेब देशमुख हे कुप्पी गावातील सरकारी प्राथमिक शाळेत, तर गुरुराज जोशी हे हुनासुगी येथील सरकारी मुलींच्या हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करत होते. ऑक्टोबर २०२५ मध्ये हुनासुगी आणि विजापूर येथील तालीकोटी भागात आरएसएसतर्फे संचलन आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये हे दोघे शिक्षक सहभागी झाले होते. याप्रकरणी 'आंबेडकर स्वाभिमानी सेने'चे जिल्हाध्यक्ष जुमन्ना गुडीमानी यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनंतर झालेल्या चौकशीत सरकारी कर्मचाऱ्याने अशा कार्यक्रमांत सहभागी होणे नियमांचे उल्लंघन ठरल्याचे स्पष्ट झाले, ज्यानंतर दोघांना निलंबित करण्यात आले.



आरएसएसच्या कार्यक्रमांवरून कर्नाटकात राजकीय वाद


ही कारवाई अशा वेळी घडली आहे जेव्हा कर्नाटक सरकार सरकारी शाळा आणि मैदानांच्या वापराबाबत नवे कडक नियम आणण्याचा विचार करत आहे. नव्या नियमांनुसार, कोणत्याही सभेसाठी किंवा कार्यक्रमासाठी सरकारी जागेचा वापर करायचा असल्यास प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य असेल. या निर्णयामुळे आरएसएसच्या शाखा आणि इतर उपक्रमांवर मर्यादा येण्याची शक्यता आहे. याआधीही कर्नाटकाचे गृहमंत्री प्रियांक खरगे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून सरकारी जागांवर चालणाऱ्या आरएसएसच्या शाखांवर बंदी घालण्याची मागणी केली होती.

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा