Train Coaches Without Engine: रेल्वेचे 7 डब्बे विना इंजिनशिवायचं 6 किमीपर्यंत धावले! बंगळूरु -चेन्नई रेल्वेसेवा विस्कळीत; गेटमनच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ

जोलारपेट्टई रेल्वे जंक्शनच्या यार्डमध्ये ना इंजिन ना चालक तरीही धावले ७ डब्बे. गेटमनच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ.

Train Coaches Without Engine: तामिळनाडू येथील तिरूपत्तर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रेल्वेच्या सुरक्षितेतील निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आले आहे. जोलारपेट्टई रेल्वे जंक्शनच्या यार्डमध्ये ना इंजिन ना चालक तरीही धावले 7 डब्बे. गेटमनच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ. तब्बल 6 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर हे डब्बे तामलेरी मुथुर परिसरात रुळावरून घसरले. परंतु, सुदैवाने गेटमनच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.



या घटनेमुळे बंगळुरू आणि चेन्नई येथील रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. पुढील संभाव्य अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने बंगळुरूकडून जोलारपेट्टईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या थांबवल्या आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, हे 7 डब्बे कोच मेंटेनन्स यार्ड मध्ये दुरुस्तीच्या कामासाठी उभे करण्यात आले होते. एका इंजिनने या डब्ब्यांना पुढे ढकलण्यात आले होते. मात्र, कर्मचाऱ्यांनी हे डब्बे सुरक्षितपणे लॉक केले नाहीत किंवा त्यावर योग्य ते नियंत्रण ठेवले नाही. त्यामुळे इंजिन वेगळे होताच हे डब्बे उताराच्या दिशेने आपोआप धावू लागले. धावत- धावत सुमारे ६ किमी हे डब्बे पुढे गेले. शेवटी तामलेरी मुथुर परिसरात हे डब्बे रुळावरून खाली घसरले. (Train Coaches Without Engine)






सदर घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळताच, घटनास्थळी रेल्वे कर्मचारी दाखल होऊन मुख्य मार्गावरून घसरलेले डब्बे हटवण्याचे काम सुरु करण्यात आले. डब्ब्यांना एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी गॅस- कटिंग उपकरणांचा वापर करण्यात आला. तर डब्ब्यांना रेल्वे मार्गावरून बाजूला करण्यासाठी जेसीबी यंत्रणेची मदत घेण्यात आली. या घटनेमुळे बंगळुरू आणि चेन्नई येथील मुख्य रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे अनेक महत्वाच्या गाड्या उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले.


Comments
Add Comment

Vande Bharat Export: फ्रान्स, जर्मनी आणि युएसमध्येही धावणार वंदे भारत! रेल्वे मंत्र्यांनी दिली माहिती

[caption id="attachment_1071383" align="aligncenter" width="800"] वंदे भारत ट्रेनमध्ये चांगल्या सुविधा आहेत. त्यामुळे भारतीयांमध्ये या ट्रेनमधून प्रवास

Gold Purity Check: सोने खरे की खोटे? 5 स्टेप्समध्ये करा शुद्धतेची पडताळणी!

भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला विशेष महत्त्व आहे. सण-उत्सव, लग्नसराई किंवा धनत्रयोदशीसारख्या शुभ मुहूर्तावर

Punjab Politics : पंजाबमध्ये 'आप'ला मोठा हादरा; एकाच दिवशी ३ आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश, भगवंत मान सरकारपुढील अडचणी वाढल्या

चंदीगड : पंजाबमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आम आदमी पक्षाच्या (AAP) तीन

Murasu Cyclone : 'मुरासू' चक्रीवादळ आज रात्री उशिरा रौद्र रूप धारण करणार; हवामान विभागाचा इशारा

Murasu Cyclone : ‘अर्नब’ चक्रीवादळा'नंतर आता मुरासू चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरावर

Cyclone Murasu : मुरासू चक्रीवादळाचा 'या' राज्याला धोका ! ताशी 110 किमी वेगाने वाहणार वारे, किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा

Cyclone Murasu : ‘अर्नब’ चक्रीवादळा'नंतर आता मुरासू चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा

Vande Bharat Sleeper Express: 'वाराणसी जंक्शन– नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस' उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत, कसं असेल वेळापत्रक?

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी 'वाराणसी जंक्शन–