Vande Bharat Export: फ्रान्स, जर्मनी आणि युएसमध्येही धावणार वंदे भारत! रेल्वे मंत्र्यांनी दिली माहिती

देशात नव्या रेल्वे मार्गांवर वंदे भारत आणि वंदे भारत स्लीपर ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवला जात आहे. त्यामुळे प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं सोपं होतं आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी बंगळुरू आणि मुंबईला जोडणाऱ्या बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसच्या पहिल्या फेरीला हिरवा झेंडा दाखवला.

1/5 वंदे भारत ट्रेनमध्ये चांगल्या सुविधा आहेत. त्यामुळे भारतीयांमध्ये या ट्रेनमधून प्रवास करण्याची जबरदस्त क्रेझ आहे. स्वदेशी बनावटीची ही ट्रेन आणखी सुधारण्यासाठी भारतीय रेल्वे काम करत आहे. असं असताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव याने मोठं विधान केलं आहे. (Photo: @RailMinIndia Twitter)

2/5 रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, भारत पुढील तीन ते चार वर्षांत संपूर्ण वंदे भारत गाड्यांची निर्यात सुरू करेल. भारतीय रेल्वे आपल्या स्वदेशी ट्रेन सेटमध्ये सातत्याने सुधारणा करत आहे. इतकंच काय तर प्रोपल्शन सिस्टीम व बोगी यांसारख्या काही भागांची स्वित्झर्लंड, जर्मनी, फ्रान्स, इटली आणि अमेरिकेला निर्यात करण्यास आधीच सुरुवात केली आहे. (Photo: @RailMinIndia Twitter)

3/5 रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते, "वंदे भारत रेल्वेगाडीच्या प्रत्येक आवृत्तीसोबत आम्ही सुधारणा करत आहोत. प्रत्येक वेळी नवीन आवृत्ती बनवताना आम्ही मागील आवृत्तीतून शिकलेल्या गोष्टींवर आधारित रचना करतो." (Photo: @RailMinIndia Twitter)

4/5 रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, वंदे भारतच्या स्लीपर आवृत्तीमध्ये मधल्या आणि वरच्या बर्थचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष सुविधा आहेत. तसेच धक्के कमी करून आराम वाढवण्यासाठी प्रगत कपलरची रचना करण्यात आली आहे. (Photo: ANI)

5/5 बंगळूरु-मुंबई वंदे भारत नियमित सेवा 2 नोव्हेंबर रोजी मुंबईहून आणि 3 नोव्हेंबर रोजी बंगळूरुहून सुरू होत आहे. बंगळुरु-मुंबई ट्रेन सोमवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावेल. ही ट्रेन सायंकाळी 7:45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11:55 वाजता पोहोचेल. परतीची ट्रेन मंगळवार वगळता मुंबईहून रात्री 8:10 वाजता सुटेल आणि बंगळुरुला दुपारी 12 वाजता पोहोचेल. (Photo: ANI)

 
Comments
Add Comment

Yogi Adityanath : "समाजवादी पक्षाच्या काळात उत्तर प्रदेशात कांवड यात्रा रोखली जायची"; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा जोरदार हल्लाबोल

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aditynath) यांनी सोमवारी गोंडा जिल्ह्यात एका जाहीर सभेला

दिल्लीकरांना तात्पुरता दिलासा! हरित फटाके फोडण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी, पण...

सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली एनसीआरमधील रहिवाशांना दिवाळीत फटाक्यांच्या वापराबाबत महत्त्वपूर्ण दिलासा दिला

Train Coaches Without Engine: रेल्वेचे 7 डब्बे विना इंजिनशिवायचं 6 किमीपर्यंत धावले! बंगळूरु -चेन्नई रेल्वेसेवा विस्कळीत; गेटमनच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ

Train Coaches Without Engine: तामिळनाडू येथील तिरूपत्तर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रेल्वेच्या सुरक्षितेतील

Gold Purity Check: सोने खरे की खोटे? 5 स्टेप्समध्ये करा शुद्धतेची पडताळणी!

भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला विशेष महत्त्व आहे. सण-उत्सव, लग्नसराई किंवा धनत्रयोदशीसारख्या शुभ मुहूर्तावर

Punjab Politics : पंजाबमध्ये 'आप'ला मोठा हादरा; एकाच दिवशी ३ आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश, भगवंत मान सरकारपुढील अडचणी वाढल्या

चंदीगड : पंजाबमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आम आदमी पक्षाच्या (AAP) तीन

Murasu Cyclone : 'मुरासू' चक्रीवादळ आज रात्री उशिरा रौद्र रूप धारण करणार; हवामान विभागाचा इशारा

Murasu Cyclone : ‘अर्नब’ चक्रीवादळा'नंतर आता मुरासू चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरावर