Nashik : कांद्यापासून AI पर्यंत ! मुख्यमंत्री फडणवीसांनी नाशिकच्या शेतकऱ्यांना सांगितला तंत्रज्ञानाचा मंत्र

Nashik : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विविध विकासकामांचे उदघाटन आणि लोकार्पणासाठी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. दिंडोरीतील कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्राशी निगडित अनेक विषयांवर भाष्य केले.


यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नाशिक जिल्हा हा शेतीच्या बाबतीत प्रगतीशील जिल्हा आहे. शेती, फळबागा या क्षेत्रात झालेली प्रगती विलक्षण आहे. इथला शेतकरी अतिशय मेहनती आहे. आदिवासी भागात वेगवेगळ्या प्रकारची वनउपज करणारा आमचा जिल्हा आहे. आज आपण द्राक्षाचा विचार केला, तर देशाच्या द्राक्ष निर्यातीत एकूण 80 टक्के निर्यात नाशिकमधून होते. नाशिकने हे कमावलेलं नाव आहे, आमच्या माता-भगिनींच्या डोळ्यात माहित नाही पण नाशिकचा कांदा आमच्या डोळ्यात मात्र वर्षातून दोनदा पाणी आणतो. संपूर्ण देशात नाशिकचा कांदा अतिशय प्रसिद्ध आहे. लासलगावसारखं (Lasalgaon) कांद्याचं केंद्र आहे असं म्हणत येथील शेतकऱ्यांचे कौतुक केले.



शेतीचा उत्पादन खर्च उत्पादन खर्च कमी होऊ शकतो


कांद्याला चांगले भाव असल्याने कोणी कांदे घेऊन आला नाही. वर्षातून एकदातरी कांदे भेट मिळतात. आता कांदे भेट मिळाले असते तर घरी नेले असते. भाव पडतात तेव्हा कांदे भेट मिळतात. निश्चित तो शेतकऱ्यांचा अधिकार आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “शेतमालाचा भाव जेव्हा कमी होतो, तेव्हा होणारं दु:ख, त्याचे परिणाम आम्ही पाहतो. शेती क्षेत्रात तंत्रज्ञान येणं महत्वाचं आहे” असं फडणवीस म्हणाले. आपली लोकसंख्या, परिवार वाढले, आपल्या राज्यात 80 टक्के शेतकरी अल्पभूधारक शेतकरी आहे. शेतकरी अल्पभूधारक असल्याने शेतकऱ्याची गुंतवणूक क्षमता कमी आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.  AI च्या वापर केला तर उत्पादन खर्च 25 ते 30 टक्के कमी करु शकतो. APP मध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

मंत्रोच्चाराच्या घोषात त्र्यंबकेश्वर येथे विधिवत ध्वजस्तंभ पूजन, 31 फूट उंच भव्य ध्वजस्तंभाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पूजन; पाहा खास क्षण

[caption id="attachment_1066607" align="aligncenter" width="800"] त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विधिवत

सचिन सानप शिवसेनेचा उमेदवार नाही! उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

मुंबई : पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत समन्वयाचा अभाव दिसत असताना, उद्योगमंत्री उदय सामंत

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

Gold Rate Today : आनंदाची बातमी ! सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचे भावही उतरले

Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात गुरुवार, 15 ऑक्टोबर रोजी मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून

Durga Puja 2026 : नवरात्रीचा उत्साह अन् दुर्गेचा जागर! जाणून घ्या दुर्गापूजेचे संपूर्ण वेळापत्रक, धार्मिक महत्त्व आणि मुख्य विधी

हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि मुख्य सणांपैकी एक असलेल्या दुर्गापूजा (Durga Puja) उत्सवाला सुरुवात होत आहे. वाईटावर