Nashik : कांदा एक्सप्रेस आता चेन्नईला ! मनमाडहून ८०० टन कांदा रवाना होणार

Nashik : देशभरात कांद्याच्या भावात अचानक वाढ झाल्यानंतर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदीचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथून पहिली कांदा एक्सप्रेस दिल्लीला रवाना झाल्यानंतर आता मनमाडहूनही कांदा एक्सप्रेस धावणार आहे. मनमाड रेल्वे स्थानकातून (Manmad Railway Station) तब्बल ८०० मेट्रिक टन कांदा चेन्नईला पाठवला जाणार आहे. यासाठी रेल्वेच्या २१ बोगींमध्ये कांदा भरण्याचे काम सुरू असून, संध्याकाळपर्यंत ही कांदा एक्सप्रेस चेन्नईच्या दिशेने रवाना होणार आहे. (Nashik News)



कांदा एक्सप्रेस आता चेन्नईला


कांद्याच्या दरात वाढ होताच केंद्र सरकारने बाजारातील दर नियंत्रणात आणण्यासाठी नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून खरेदी केलेला बफर स्टॉकमधील कांदा देशातील विविध बाजारपेठांमध्ये पाठवण्याचे नियोजन केले आहे. याच अंतर्गत दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या लासलगाव रेल्वे स्थानकातून (Lasalgaon Railway Station) ४५० मेट्रिक टन कांदा घेऊन पहिली कांदा एक्सप्रेस दिल्लीच्या दिशेने रवाना झाली होती. त्यानंतर आता मनमाड रेल्वे स्थानकातूनही कांदा एक्सप्रेस चेन्नईला पाठवण्यात येत आहे. त्यासाठी मनमाडच्या रेल्वे मालधक्क्यावर कांदा भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. (Nashik News)



कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा नाराजीचा सूर


नाशिक जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये नाफेड आणि एनसीसीएफने साठवून ठेवलेल्या गोदामांमधून हा कांदा ट्रकच्या माध्यमातून मनमाडमध्ये आणला जात आहे. सुमारे २१ डब्यांच्या रेल्वेतून तब्बल ८०० मेट्रिक टन कांदा चेन्नईच्या दिशेने रवाना होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे बाजारात कांद्याचा पुरवठा वाढून दरात घसरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. दरम्यान, शेतकऱ्यांकडून कांदा बाजारात पाठवण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात असतानाच, मनमाडहून पाठवण्यात येणाऱ्या बफर स्टॉकमधील कांद्यात काहीसा खराब आणि हलक्या प्रतीचा कांदा असल्याचेही दिसून येत आहे. यामुळे कांद्याच्या गुणवत्तेबाबतही चर्चा सुरू झाली आहे. (Nashik News)



मुख्यमंत्री नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर


विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी लासलगाव येथून दिल्लीच्या दिशेने कांदा एक्सप्रेस रवाना होत असताना प्रहार संघटनेच्या तालुका अध्यक्षांकडून ही कांदा एक्सप्रेस अडवण्यात आली होती. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून या आंदोलनामुळे प्रशासनाचीही चांगलीच धावपळ उडाली होती. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नाशिक जिल्हा पोलिस प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या