Grand Chess Tour Final : प्रज्ञानानंदने रचला इतिहास, ग्रँड चेस टूर फायनल जिंकणारा पहिला भारतीय ठरला

सेंट लुईस : भारतीय बुद्धिबळपटू आणि ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदाने फॅबियानो करूआनाचा पराभव करत इतिहास रचला आहे. सेंट लुईसमध्ये झालेल्या Grand Chess Tour Finalsच्या अंतिम सामन्यात प्रज्ञानानंदाने १५-१३ असा विजय मिळवत विजेतेपद पटकावलं. या विजयासह तो Grand Chess Tour Finals जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. अंतिम सामन्याच्या शेवटच्या दिवशी प्रज्ञानानंदासमोर मोठं आव्हान होतं. तो तब्बल सहा गुणांनी पिछाडीवर होता. पहिल्या क्लासिकल गेममध्ये करूआनाने ६-० अशी आघाडी घेतली, तर दुसरा क्लासिकल सामना ३-३ असा बरोबरीत राहिला.



मात्र, प्रज्ञानानंदाने हार न मानता जबरदस्त पुनरागमन केलं. त्याने दोन्ही रॅपिड गेम जिंकत सामन्यात जोरदार कमबॅक केलं. त्यानंतर ब्लिट्झ गेम्समध्येही त्याने आवश्यक नियंत्रण राखलं आणि अखेर एकूण १५-१३ असा विजय मिळवत ट्रॉफीवर नाव कोरलं. या ऐतिहासिक विजेतेपदासाठी प्रज्ञानानंदाला तब्बल २ लाख अमेरिकन डॉलरचं बक्षीस मिळालं आहे. भारतीय बुद्धिबळासाठीही हा मोठा क्षण मानला जात आहे.



विजयानंतर प्रज्ञानानंदाने या स्पर्धेचं महत्त्व अधोरेखित केलं. जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेनंतर Grand Chess Tour ही जगातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धांपैकी एक असल्याचं त्याने म्हटलं. या स्पर्धेचं विजेतेपद मिळवणं आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचंही त्याने सांगितलं. विशेष म्हणजे, प्रज्ञानानंदाने प्रतिकूल परिस्थितीतून केलेलं हे पुनरागमन त्याच्या मानसिक ताकदीचं आणि दबावाखाली खेळण्याच्या क्षमतेचं उत्तम उदाहरण ठरलं आहे. भारतीय बुद्धिबळाच्या इतिहासात प्रज्ञानानंदाच्या या विजयाची नोंद आता एका ऐतिहासिक अध्यायाप्रमाणे झाली आहे.

Comments
Add Comment

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सामना पराभवाचा वेग काही भलताच, आतापर्यंत सर्व भारतीय कर्णधारांना टाकलं मागे

[caption id="attachment_1066530" align="aligncenter" width="800"] वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि मालिका विजयाचं गणित

IND vs WI: वेस्ट इंडिजने चौथ्या सामन्यात डाव साधला, भारताला नमवून मालिकेत 2-2 ने बरोबरी

वेस्ट इंडिजने चौथ्या टी20 सामन्यात भारताला नमवून मालिका विजयाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. या मालिकेत चौथ्या