R Praggnanandhaa : प्रज्ञानंदचा ऐतिहासिक विजय! कारुआनाला नमवत ग्रँड चेस टूरचा पहिला भारतीय चॅम्पियन

भारतीय बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदने गुरुवारी सेंट लुईस येथे फॅबियानो कारुआनाविरुद्ध शानदार पुनरागमन करत ग्रँड चेस टूर फायनल्सचे विजेतेपद पटकावले. हे त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचे सर्वात मोठे विजेतेपद ठरले आहे. या विजयासह प्रज्ञानंद ग्रँड चेस टूर जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. विजेतेपदासोबत त्याला 2 लाख डॉलर्सचे बक्षीसही मिळाले. (R Praggananandha)


अंतिम सामन्याच्या सुरुवातीला प्रज्ञानंद मोठ्या अडचणीत होता. क्लासिकल सामन्यांनंतर फॅबियानो कारुआनाकडे 6 गुणांची आघाडी होती. पहिल्या क्लासिकल गेममध्ये प्रज्ञानंदला 6-0 असा पराभव स्वीकारावा लागला. मात्र, त्याने दुसऱ्या क्लासिकल गेममध्ये कारुआनाला 3-3 अशी बरोबरीत रोखले आणि अंतिम दिवसासाठी आशा कायम ठेवली. (R Praggananandha news)



अंतिम दिवशी प्रज्ञानंदने रॅपिड विभागात जबरदस्त खेळ करत कारुआनाविरुद्धचे दोन्ही सामने जिंकले. त्यामुळे 6 गुणांची पिछाडी भरून काढत त्याने सामन्यात जोरदार पुनरागमन केले. त्यानंतर ब्लिट्झमध्ये त्याने संयम राखत आपली आघाडी कायम ठेवली. ( Grand Chess Tour)


ब्लिट्झमधील सुरुवातीच्या सामन्यात प्रज्ञानंदसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, कारुआनाला आवश्यक विजय मिळवता आला नाही आणि सामना बरोबरीत संपला. त्यानंतर प्रज्ञानंदने उर्वरित सामन्यांमध्ये नियंत्रण राखत एकूण 15-13 असा विजय मिळवला.


दरम्यान, तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात जीएम वेस्ली सो यांनी व्हिन्सेंट केमरवर 18-12 असा विजय मिळवला. रॅपिडमध्ये दोघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला होता. मात्र, ब्लिट्झमध्ये सो यांनी चारही सामने जिंकत तिसरे स्थान निश्चित केले.


प्रज्ञानंदच्या या विजयामुळे भारतीय बुद्धिबळासाठी नवा इतिहास घडला आहे. ग्रँड चेस टूरसारख्या मोठ्या स्पर्धेत विजेतेपद मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला असून, त्याच्या या कामगिरीमुळे भारतीय बुद्धिबळाला आणखी मोठी ओळख मिळाली आहे.


Comments
Add Comment

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सामना पराभवाचा वेग काही भलताच, आतापर्यंत सर्व भारतीय कर्णधारांना टाकलं मागे

[caption id="attachment_1066530" align="aligncenter" width="800"] वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि मालिका विजयाचं गणित

IND vs WI: वेस्ट इंडिजने चौथ्या सामन्यात डाव साधला, भारताला नमवून मालिकेत 2-2 ने बरोबरी

वेस्ट इंडिजने चौथ्या टी20 सामन्यात भारताला नमवून मालिका विजयाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. या मालिकेत चौथ्या

IND vs WI: शाई होपने भारतीय गोलंदाजांना धुतलं, शतक ठोकत टीम इंडियाला बॅकफूटला ढकललं

भारत वेस्ट इंडिज मालिकेतील चौथा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरू आहे. या