Rahul Deshpande : ‘कुंभ भक्ती संगम’मध्ये राहुल देशपांडे यांच्या ‘अभंगवारी’ने रंगली भक्तिरसाची मैफल

नाशिक : ‘कुंभ भक्ती संगम’च्या पहिल्या दिवसाची सांगता राहुल देशपांडे यांच्या ‘अभंगवारी’ने भक्तिरसात झाली. ठक्कर डोम येथे झालेल्या या विशेष संगीत कार्यक्रमात अभंगांच्या भावपूर्ण आणि सुरेल सादरीकरणाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. पारंपरिक अभंगांना संगीताच्या विविध रंगांची जोड देत राहुल देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.



‘गजर’ने सुरू झालेल्या या अभंगवारीत ‘राजस सुकुमार’, ‘भाग्यदा’, ‘आनंदाच्या कोटी’ आणि ‘खेळ मांडियेला’ यांसारख्या रचनांनी मैफलीत रंग भरला. त्यानंतर ‘काळ देहासी’, ‘अबीर गुलाल’, ‘तीर्थ विठ्ठल’ आणि ‘माझे माहेर’ या अभंगांच्या सादरीकरणातून भक्ती आणि भावनांचा सुरेल आविष्कार झाला. ‘कानडा राजा’ या अभंगाने मैफलीची सांगता झाली.



राहुल देशपांडे यांच्या सोबत कलाकारांची सुरेल साथ


‘अभंगवारी’मध्ये राहुल देशपांडे यांनी मुख्य गायनाची धुरा सांभाळली. त्यांना दीप्ती माटे यांनी मुख्य गायनातून साथ दिली, तर विघ्नेश जोशी यांनी निवेदनाची जबाबदारी सांभाळली. संगीत संयोजनात निखिल फाटक (तबला), मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), विशाल धुमाळ (की-बोर्ड), निनाद मुळाओकर (बासरी), रोहन वणगे (तालवाद्य), प्रसाद जोशी (पखावज) आणि राहुल देव (बास गिटार) यांनी साथ दिली. ऋषिकेश पाटील, निमिष उत्पात आणि राजस जोशी यांनी कोरसची साथ केली. कार्यक्रमाच्या ध्वनिव्यवस्थेची जबाबदारी परीक्षित कुलकर्णी यांनी सांभाळली. वाद्यवृंदातील विविध वाद्यांची सुरेल सांगड, मुख्य गायकांचा आवाज आणि अभंगातील भक्तिभाव यामुळे संपूर्ण सादरीकरणाला विशेष रंगत आली.



नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आयोजित ‘कुंभ भक्ती संगम’च्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमांना नाशिककर आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प. पू. अमृताश्रम स्वामी महाराज यांच्या कीर्तनाने सुरू झालेला ‘कुंभ भक्ती संगम’चा पहिला दिवस राहुल देशपांडे यांच्या ‘अभंगवारी’ने भक्तिरसात न्हाऊन निघाला. विविध अभंगांच्या सादरीकरणाने ठक्कर डोमचा परिसर भारावून गेला आणि भक्ती, संगीत व सांस्कृतिक परंपरेच्या या त्रिदिवसीय सोहळ्याच्या पहिल्या दिवसाची संस्मरणीय सांगता झाली.

Comments
Add Comment

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे