Mohan Bhagwat : मोहन भागवतांना विरोध करणाऱ्या ममदानींचे संघांने टोचले कान, आयोजकांचे एक्स अकाऊंटही पुन्हा सुरू

न्यूयॉर्क : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दृष्टी आणि विचारसरणी यांविषयी अधिक जाणून घेण्यास इच्छुक असलेल्या कोणालाही संवादाच्या या खुल्या मंचांमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण देतो, असे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी न्यूयॉर्कमध्ये आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. (Mohan Bhagwat)


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सध्या अमेरिका दौऱ्यावर असून, या दौऱ्यावरून अमेरिकेत काही ठिकाणी विरोध दर्शवला जात आहे. मोहन भागवत २९ ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथील इन्फोसिस थिएटरमध्ये 'युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन्स' कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. विविध धर्म आणि संस्कृतींच्या लोकांचा हा आंतरधर्मीय कार्यक्रम असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर सुनील आंबेकर यांनी 'एक्स'वर पोस्ट करून या कार्यक्रमाबाबतची भूमिका मांडली आहे. (Mohan Bhagwat)



दरम्यान, न्यूयॉर्कमधील मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या संस्थेचे 'एक्स' अकाऊंट सस्पेंड करण्यात आले होते. संस्थेच्या विनंतीनंतर अवघ्या काही तासांतच हे अकाऊंट पूर्ववत करण्यात आले आहे. आयोजकांनी एका पोस्टद्वारे खाते सुरू झाल्याची माहिती दिली. विरोधकांनी बॉट हल्ला करून 'एक्स'च्या अल्गोरिदममध्ये फेरफार करून हे हँडल ब्लॉक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. आता पुन्हा एकदा वैश्विक सुसंवाद आणि वैश्विक एकात्मता या खऱ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करूया, असे संस्थेने म्हटले आहे. अकाऊंट पूर्ववत झाले असले, तरी या संपूर्ण घटनेमुळे अमेरिकेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दाव्यांवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Mohan Bhagwat)


न्यूयॉर्कमधील 'युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन' (विश्व-एकात्मता सोहळा) हा विविध धर्म, संस्कृती आणि श्रद्धा असलेल्या जनसमुदायाशी संवाद साधणारा आंतरधर्मीय मेळावा आहे. मुक्त संवाद आणि परस्पर आदराच्या भावनेतून आयोजित केलेला हा कार्यक्रम भारतीय जीवनमूल्यांचे प्रतिबिंब दर्शवतो; ही मूल्ये मुळातच सर्वसमावेशक असून सर्वांचे स्वागत करणारी आहेत. हा उपक्रम आर.एस.एस.च्या दीर्घकालीन परंपरेशी सुसंगत असून, यादरम्यान भारत आणि जगभरातील विविध समुदायांशी संवाद साधून परस्पर सामंजस्य व सामायिक उद्दिष्टे जोपासली जातात, असे सुनील आंबेकर यांनी नमूद केले आहे. (Mohan Bhagwat)

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे