Terrorist in prison : कारागृहात दहशतवाद्याकडून 3 आयफोनसह रोकड जप्त

कोलकाता : पश्चिम बंगालमधील अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या कोलकात्याच्या अलीपूर येथील प्रेसिडेन्सी सेंट्रल जेलमध्ये पुन्हा एकदा गंभीर सुरक्षा त्रुटी समोर आली आहे. कोलकाता येथील अमेरिकन माहिती केंद्रावर 2002 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कुख्यात दहशतवादी आफताब अहमद अन्सारीच्या सेलमध्ये छापा टाकल्यानंतर मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि रोकड आढळून आली आहे.



गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारागृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी आफताबच्या 14 क्रमांकाच्या सेलची सखोल झडती घेतली. यावेळी कपडे आणि बिछान्याच्या थरांमध्ये लपवून ठेवलेले तीन आयफोन, दोन वाय-फाय राऊटर, पेन ड्राइव्ह, दोन कार्ड रीडर, इअरफोन तसेच 31 हजार रुपये रोख जप्त करण्यात आले.जप्त करण्यात आलेली रोकड 500 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी हेस्टिंग्ज पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे.तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, आफताब कारागृहाच्या आतून व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामसारख्या संदेशवहन ऍप्सचा वापर करत असल्याचा संशय आहे. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांनी त्याच्या कारागृहातील संपर्कांची चौकशी सुरू केली आहे. तो पाकिस्तानातील जुन्या सूत्रधारांच्या किंवा सीमापार दहशतवादी नेटवर्कच्या संपर्कात होता का, याचाही तपास केला जात आहे.



या घटनेमुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर तसेच संभाव्य भ्रष्टाचारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही निगराणी असतानाही इतकी इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मोठी रोकड कारागृहात पोहोचली कशी ? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, या प्रकरणात पैशांच्या मोबदल्यात आफताबला मदत करणाऱ्या कारागृह कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सुरक्षा यंत्रणेतील नेमकी कोणती त्रुटी राहिली आणि या उपकरणांचा वापर कोणत्या कारणासाठी केला जात होता, याचा तपास सध्या सुरू आहे.

Comments
Add Comment

Swine Flu : महाराष्ट्रासह दिल्ली, कर्नाटकात 'स्वाईन फ्लू'च्या रुग्णांच्या संख्येत वाढ

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र,

General Zhao Zongqi : 'ऑपरेशन गलवान'चा आदेश देणाऱ्या जनरल झाओ जोंगकीला पदावरून हटवले

शांघाय: चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या सरकारनं एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेत, देशाचे प्रमुख राजकीय

India China Border : भारत-चीन सीमा विवादावर टप्प्याटप्प्याने तोडग्याची तयारी

नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील सहा दशकांहून जुना सीमा विवाद टप्प्याटप्प्याने सोडवण्याच्या दिशेने हालचाली

FSSAI New Rules : पॅकबंद पदार्थांच्या पाकिटांवर आता दिसणार 'धोक्याचा सिम्बॉल'

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर ताश्याऱ्यानंतर, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने पॅकबंद

The Great Khali : रेसलर खलीचा पंजाबमधून सोनीपतला जाताना अपघात

पानीपत : प्रसिद्ध कुस्तीपटू आणि WWE स्टार द ग्रेट खलीच्या कारचा शनिवारी पानीपत टोल प्लाझाजवळ अपघात झाला. पंजाबमधून

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी उझबेकिस्तानमध्ये पोहोचले, दोन दिवसांच्या दौऱ्यात भारत - उझबेकिस्तानमध्ये होणार अनेक महत्त्वाचे करार

ताश्कंद : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी शनिवारी संध्याकाळी उझबेकिस्तानमध्ये पोहोचले. ते