Raigad : शारलोट लेक रिकामा, पर्यटनाचा हंगाम कोरडा; माथेरानकरांचा व्यवसाय ठप्प?

रायगड : पावसाळ्यात पर्यटकांच्या गर्दीने फुलणाऱ्या माथेरानच्या पर्यटनाला यंदा शारलोट लेक रिकामा केल्याचा मोठा फटका बसला आहे. वर्षानुवर्षे माथेरानच्या पावसाळी पर्यटनाचे प्रमुख आकर्षण ठरणारे शारलोट लेक यंदा गाळ काढण्याच्या कारणास्तव रिकामे करण्यात आल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला असून, पर्यटनावर अवलंबून असलेल्या स्थानिक व्यावसायिकांच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे.


पावसाळ्यात माथेरानमधील धबधबे, हिरवाई, धुक्याने वेढलेले डोंगर आणि शारलोट लेक परिसरातील निसर्ग पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करतो. विशेषतः मुंबई आणि पुणे परिसरातून वर्षासहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या या काळात वाढते. मात्र, यंदा सुमारे बारा वर्षांनंतर शारलोट लेकचे पाणी सोडण्यात आल्याने या पर्यटनस्थळाचे प्रमुख आकर्षणच कमी झाले आहे.



स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, १० ऑगस्ट रोजी लेक रिकामा करण्याची आवश्यकता नसतानाही तो सोडण्यात आला. यासाठी कोणतीही शासकीय पूर्वपरवानगी घेण्यात आली होती का, असा सवालही उपस्थित होत आहे. तसेच संबंधित ठेकेदाराला काम पूर्ण होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात बिलाची रक्कम अदा करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या आरोपांची अधिकृत पुष्टी मात्र उपलब्ध नाही.


लेक कोरडा पडल्याचा परिणाम लॉज, हॉटेल, रेस्टॉरंट, स्टॉल व टपरीधारकांसह अन्य स्थानिक व्यावसायिकांवर झाला आहे. चौथ्या शनिवारच्या सुट्टीच्या दिवशीही अनेक लॉजमध्ये अपेक्षित पर्यटकसंख्या नसल्याने खोल्या रिकाम्या राहिल्याचे स्थानिकांनी सांगितले.


दरम्यान, माथेरानमध्ये स्वच्छता, कचरा, रस्ते, गटारे आणि पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांवरही पर्यटक व नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. दस्तुरी नाका आणि पार्किंग परिसरात कचरा साचल्याचे, रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे तसेच गटारे तुंबल्याचे आरोप करण्यात आले आहेत. “नियोजनशून्य कामांमुळे माथेरानच्या पर्यटनाची अवस्था बिकट झाली आहे,” असा आरोप नगरसेवक सचिन दाभेकर यांनी केला आहे.

Comments
Add Comment

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे