Gold Silver Rate Today : सोने चांदीचे आजचे दर काय ?

Gold Silver Rate Today : शुक्रवारी रक्षाबंधनाच्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात वाढ नोंदवली गेल्याने ग्राहकांना मोठा धक्का बसला. रक्षाबंधनाच्या दिवशी अनेकांना सोन्याची भेटवस्तू किंवा दागिने घेण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांना यामुळे चांगलाच धक्का बसला. मात्र, दुसऱ्याच दिवशी शनिवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर दोन्ही धातूंचे दर पुन्हा मोठ्या प्रमाणात घसरल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.



सोन्याचे आजचे दर किती ?


जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शुक्रवारी रक्षाबंधनाच्या दिवशी ८२४ रुपयांची वाढ झाली होती. २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,६४,२८५ रुपयांपर्यंत पोहचले होते. त्यामुळे सोने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का बसला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर २८८४ रुपयांची घट झाल्याने सोने तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,६१,४०१ रुपयांपर्यंत घसरले. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.



चांदीचे आजचे दर किती ?


जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शुक्रवारी चांदीचे देखील भाव वाढले होते. चांदीच्या दरात ५१५० रुपयांची वाढ झाल्याने चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २,५४,४१० रुपयांपर्यंत पोहचले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर तब्बल ७२१० रुपयांची घसरण झाल्याने चांदी तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २,४७,२०० रुपयांपर्यंत खाली आली.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण