Nashik Crime : सिंहस्थाच्या नावाने बनावट भरतीचा डाव ! बेरोजगारांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Nashik Crime : आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२६च्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि पॅरामेडिकल क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. याच संधीचा फायदा घेत शासकीय भरती असल्याचा बनाव करून बेरोजगार तरुणांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका टोळीचा पंचवटी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.



सिंहस्थाच्या नावाने बनावट भरतीचा डाव !


‘बंपर कुंभमेळा भरती २०२६-२०२७’ या नावाने सोशल मीडियावर बनावट जाहिरात प्रसारित करून ही भरती थेट शासन किंवा आरोग्य विभागाकडून होत असल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन रतन शिंदे, वय २९, रा. देवळा, जि. नाशिक, हा या संस्थेचा अध्यक्ष असून त्याचा व्यवसाय ॲम्बुलन्स चालकाचा आहे. निलेश बबन घोलप, वय २२, रा. ओतूर, ता. कळवण, हा संस्थेचा सचिव असून तो मेडिकल सर्व्हेअर म्हणून काम करतो. तर विक्रांत विजय सूर्यवंशी, वय ३०, रा. तांबे मळा, पेठ रोड, हा संस्थेचा उपाध्यक्ष असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. (Nashik Crime News)



बनावट भरतीची जाहिरात तयार केली अन्...


या तिघांनी ‘हिलफोर्स फाऊंडेशन मल्टिसर्व्हिसेस’ या संस्थेच्या माध्यमातून ही बनावट भरतीची जाहिरात तयार केली होती. व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही जाहिरात मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य संशयित हा ॲम्बुलन्स चालक असल्याची माहिती समोर आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील दैनंदिन कामाच्या अनुभवातून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात आरोग्य कर्मचारी आणि पॅरामेडिकल स्टाफची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार असल्याची त्याला कल्पना होती. याच माहितीचा गैरफायदा घेत त्याने आपल्या दोन मित्रांना सोबत घेत ही संस्था सुरू केल्याचा आरोप आहे.


पंचवटीतील आरटीओ कार्यालयासमोरील एका हॉस्पिटलजवळ असलेल्या कॉम्प्लेक्समध्ये भाड्याने कार्यालय घेऊन या संस्थेचे काम सुरू करण्यात आले होते. खासगी रुग्णालयांना पॅरामेडिकल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे काम या संस्थेमार्फत केले जात होते. मात्र, कोणतीही शासकीय परवानगी नसताना आणि कोणत्याही अधिकृत शासकीय भरती प्रक्रियेशी संबंध नसतानाही ‘सिंहस्थ कुंभमेळा’ या नावाचा वापर करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बनावट भरतीची जाहिरात तयार करण्यात आली. ही जाहिरात थेट शासकीय किंवा आरोग्य विभागाचीच असल्याचा आभास निर्माण करून बेरोजगार उमेदवारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. (Nashik Crime News)



पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल


दरम्यान, ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होताच आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली. संदर्भ सेवा रुग्णालयाचे डॉ. योगेश चित्ते, रा. चेतना नगर, यांनी याची गंभीर दखल घेत थेट पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी २७ ऑगस्ट रोजी संशयितांविरोधात माहिती व तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार करत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, या टोळीने बनावट भरतीची जाहिरात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित केली असली, तरी सुदैवाने आतापर्यंत कोणत्याही उमेदवाराची प्रत्यक्ष आर्थिक फसवणूक झालेली नसल्याचे तपासात समोर आले आहे.



अफवांना बळी पडू नका !


दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित कोणतीही अधिकृत भरती प्रक्रिया ही केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळांवर, संबंधित विभागाच्या अधिकृत माध्यमातून किंवा अधिकृत निविदा प्रक्रियेद्वारेच जाहीर केली जाते. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ‘कुंभमेळा भरती’, ‘शासकीय भरती’ किंवा ‘आरोग्य विभागातील नोकरी’ अशा जाहिरातींची खातरजमा केल्याशिवाय कोणत्याही उमेदवाराने त्यावर विश्वास ठेवू नये. व्हॉट्सॲप मेसेज, इंस्टाग्राम पोस्ट किंवा खासगी एजन्सींकडून मिळणाऱ्या नोकरीच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिस प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल