Nashik : दिंडोरीच्या आश्रमशाळेत दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या , परिसरात खळबळ

Nashik : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जोपुळ येथील आश्रम शाळेतील सोळा वर्षीय विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.


दिंडोरी तालुक्यातील जोपूळ येथील आदिवासी विकास विभागांतर्गत प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील इयत्ता दहावी शिकत असलेल्या विद्यार्थ्याने गुरुवारी (ता. २७) सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास आश्रमशाळेतील निवासाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीय. या घटनेने आश्रमशाळेतील विद्यार्थी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हरीदास अंबादास शेखरे (वय १६, रा. गळवट, ता. सुरगाणा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.(Nashik Dindori News)



नेमकं काय घडलं ?


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थी आश्रमशाळेत इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता. आश्रमशाळेतीलच एका मुलीला प्रपोज केल्याच्या कारणावरून संबंधित मुलीने वर्गशिक्षकांकडे तक्रार केली होती. वर्गशिक्षकांनी याबाबत मुख्याध्यापिकांना माहिती दिल्यानंतर विद्यार्थ्याला कार्यालयात बोलावून समज देण्यात आली होती. पालकांना बोलावून घेण्याची तसेच या प्रकारामुळे अभ्यासावर परिणाम होऊ नये, याबाबत त्याला सूचना करण्यात आली. दरम्यान त्यानंतर विद्यार्थी आपल्या निवासाच्या खोलीत गेला. काही वेळाने इतर विद्यार्थी खोलीत गेले असता त्यांना तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.  (Nashik Dindori News)



पुढील तपास सुरु


याबाबतची माहिती विद्यार्थ्यांनी तत्काळ शिक्षकांना दिली. शिक्षकांनी तातडीने त्याला खाली उतरवून उपचारासाठी पिंपळगाव बसवंत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक चौकशी केली. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती आहे. वणी पोलिस ठाण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खबरीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण