PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी उझबेकिस्तानमध्ये पोहोचले, दोन दिवसांच्या दौऱ्यात भारत - उझबेकिस्तानमध्ये होणार अनेक महत्त्वाचे करार

ताश्कंद : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी शनिवारी संध्याकाळी उझबेकिस्तानमध्ये पोहोचले. ते राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्झीयोयेव यांच्याशी अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करणार आहेत. मोदींचा हा उझबेकिस्तानचा चौथा दौरा आहे. या दौऱ्यासाठी ताश्कंदच्या विमानतळावर येताच पंतप्रधान मोदींचे राष्ट्राध्यक्ष मिर्झीयोयेव यांनी स्वागत केले. (PM Narendra Modi)


मोदी दोन देशांचा दौरा करणार आहेत. ते दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात उझबेकिस्तानमध्ये पोहोचले आहेत. नंतर ते किर्गिझस्तानचा दोन दिवसांचा दौरा करणार आहेत. मध्य आशियाई देशांशी भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आणखी दृढ करणे आणि विविक्ष क्षेत्रात सहकार्यासाठी करार करणे या हेतूनेच पंतप्रधान मोदी दौऱ्यावर आहेत. उझबेकिस्तानमध्ये व्यापार आणि गुंतवणूक हे त्यांच्या चर्चेतील दोन महत्त्वाचे विषय असतील. दोन्ही देश डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी नियोजन करणार आहेत. संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्राही भारत आणि उझबेकिस्तान सहकार्य करणार आहेत. (PM Narendra Modi)



दिल्लीतून निघताना परदेश दौऱ्याविषयी पंतप्रधान मोदींनी देशाला थोडक्यात माहिती दिली. अलिकडच्या वर्षांत भारत-उझबेकिस्तान सामरिक भागीदारीने लक्षणीय प्रगती केली आहे. उझबेक राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्झीयोयेव यांच्यासोबत व्यापार आणि गुंतवणूक, डिजिटल कनेक्टिव्हिटी, संरक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक दृढ करण्यावर, तसेच विकसित भारत आणि तरुण उझबेकिस्तानच्या सामायिक दृष्टिकोनाला पुढे नेण्यासाठी चर्चा करण्यावर भर देणार असल्याचे मोदी म्हणाले. शास्त्री स्मारक आणि ताश्कंद स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ ओरिएंटल स्टडीज येथील महात्मा गांधी केंद्रालाही भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले. (PM Narendra Modi)


मोदी उझबेकिस्तान नंतर किर्गिझस्तानचा दौरा करणार आहेत. किर्गिझ प्रजासत्ताकचे अध्यक्ष सादिर झापारोव्ह यांच्या निमंत्रणावरून बिश्केक येथे होणाऱ्या २६ व्या शांघाय सहकार्य संघटना (SCO) शिखर परिषदेत मोदी सहभागी होणार आहेत. सुरक्षा, संपर्क आणि संधी यांवर आधारित प्रदेशासाठी तसेच दहशतवाद, फुटीरतावाद व अतिरेकीपणापासून मुक्त प्रदेशासाठी SCO च्या इतर सदस्य राष्ट्रांसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे मोदी म्हणाले. त्यांनी सांगितले की, ही आव्हाने शेजारील देशांसाठी आणि शांतता व स्थिरतेसाठी सतत धोका निर्माण करत आहेत.पंतप्रधानांनी सांगितले की, किर्गिझ प्रजासत्ताकच्या दौऱ्यादरम्यान ते अध्यक्ष सादिर झापारोव्ह आणि SCO च्या इतर नेत्यांना भेटतील, तसेच ६ व्या जागतिक नोमॅडिक खेळांच्या उद्घाटन समारंभालाही उपस्थित राहतील. (PM Narendra Modi)

Comments
Add Comment

Singapore Haze 2026 : इंडोनेशियातील आगीचा सिंगापूरला फटका; प्रदूषणावर कंपन्यांवर होणार कारवाई?

सिंगापूर : इंडोनेशियातील जंगलांमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या धुरामुळे शेजारील सिंगापूरमधील हवा अत्यंत विषारी

Trump Ukraine : ट्रम्प यांचा युक्रेनला दुहेरी धक्का! रशियाकडून तेल खरेदी अन् स्टारलिंकवर निर्बंध?

वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडवून देत अमेरिकेने युक्रेनला एकाच वेळी दोन मोठे धक्के दिले आहेत.

Yemen Attack : मध्यपूर्वेत युद्धाचा भडका? येमेनमधील राजवाड्यावरील हल्ल्याने खळबळ

सना : मध्यपूर्वेतील भू-राजकीय संघर्षाला पुन्हा एकदा तीव्र उधाण आले असून, येमेनमध्ये हुती बंडखोरांनी थेट

रशियात शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा धोका आहे का, किती नुकसान झाले?

मॉस्को : रशियाच्या सुदूर पूर्वेकडील कामचटका द्वीपकल्प परिसरात शुक्रवारी भूकंपाचे अत्यंत तीव्र धक्के जाणवले.

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या