Sharad Pawar : शरद पवारांनी बोलावलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीला रोहित पवारांची दांडी

तर्कवितर्कांना उधाण; काँग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चांना बळ, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंकडून सारवासारव


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा आमदार रोहित पवार यांच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत पार पडलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीला आमदार रोहित पवार यांनी दांडी मारल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची काँग्रेस पक्षाशी वाढलेली जवळीक आणि ‘एनडीए’सोबत जाण्याबाबत असलेला विरोध, यामुळे ते पक्षाच्या धोरणांपासून अंतर राखत असल्याची चर्चा असून, या अनुपस्थितीने या चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे.



शनिवारी मुंबईत झालेल्या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, अशोक पवार, राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख आणि खासदार निलेश लंके यांसारखे प्रमुख नेते उपस्थित होते. याआधी १० दिवसांपूर्वी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीतील मुद्द्यांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत नेहमीच अग्रस्थानी असणारे रोहित पवार या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने सर्वांचेच लक्ष वेधले गेले. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाच्या काही भूमिका आणि एनडीएत जाण्याच्या शक्यतेला असलेला त्यांचा विरोध यामुळे ते या बैठकीपासून लांब राहिले. दरम्यान, रोहित पवार यांनी आपल्या गैरहजेरीबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना आधीच कल्पना दिली होती, असे सांगितले जात आहे.



विलिनीकरणाच्या चर्चेचे प्रदेशाध्यक्षांकडून खंडन


बैठकीमुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलिनीकरण होणार का किंवा पक्ष एनडीएत सहभागी होणार का, याविषयी जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या. आजच्या बैठकीत विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही आणि आमच्याकडे तसा कोणताही प्रस्तावही आलेला नाही, असे स्पष्ट करत त्यांनी संपूर्ण लक्ष पक्ष संघटना बळकट करण्यावर असल्याचे सांगितले. येत्या ऑक्टोबर महिन्यापासून राज्यभर पक्षाचे दौरे सुरू करण्यात येणार असून, संघटनात्मक फेरबदलांमध्ये युवा वर्गाला प्राधान्य दिले जाईल, असे शिंदेंनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी