Vakola River Waste Prevention : ज्ञानेश्वर नगर लगतच्या वाकोला नदीकाठी बसवणार जाळ्या

- नदीत जाणारा कचरा आता थेट रोखला जाणार


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


ज्ञानेश्वर नगर झोपडप‌ट्टीतील रहिवाशांकडून वाकोला नदीमध्ये सतत कचरा टाकला जात असून यामुळे नदीला पाण्यापेक्षा कचराच अधिक प्रमाणात जमा होतो. त्यामुळे नदीत जाणारा हा कचरा रोखण्यासाठी आता वाकोला नदीच्या काठी जाळी बसवण्यात येणार आहे. वाकोला नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर तरंगणारा कचरा दिसून येत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त आहेत. त्यानुसार, दिनांक २३ जुलै २०२५ रोजी पर्जन्य जलवाहिनी यांनी याठिकाणांना भेटी देत ज्ञानेश्वर नगर झोपडप‌ट्टीलगतच्या वाकोला नदीच्या संरक्षण भिंतीवरती जाळी बसविण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. (Vakola River Waste Prevention)



या नाल्याच्या भिंतीपासून सुमारे १० फूट उंचीची जाळी बसवण्यात येणार आहे. जेणेकरून नाल्यातील कचरा तथा तरंगणारा पदार्थ टाकण्यास प्रतिबंध होईल. अशा प्रकारच्या जाळ्या यापूर्वी मेन एव्हेन्यू नाला आणि दक्षिण एव्हेन्यू नाला येथे (एच/पश्चिम विभाग) बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाल्यात कचरा टाकण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे आढळून आले आहे. वरील बाबींचा विचार करून, ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टीलगत वाकोला नदीमध्ये कचरा टाकणे रोखण्यासाठी जाळी बसवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. (Vakola River Waste Prevention)



या जाळ्या बसवण्यासाठी पावणे दोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या जाळ्या बसवण्याच्या कामांसाठी कल्पेश कॉर्पोरेशन या कंपनीची निवड करण्यात आली आहे. महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा उणे २५ टक्के कमी दरात निविदेत भाग घेत त्यांनी हे काम मिळवले आहे. (Vakola River Waste Prevention)

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा