Switzerland Rave Shooting : स्वित्झर्लंडमध्ये रेव्ह पार्टीत अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू, पाच गंभीर जखमी

बर्न : स्वित्झर्लंडमधील आराऊ शहरात रविवारी पहाटे रेव्ह पार्टीदरम्यान झालेल्या अंदाधुंद गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, सुमारे 3,500 लोक उपस्थित असलेल्या वार्षिक टेक्नो पार्टीदरम्यान ही हिंसक घटना घडली. अज्ञात हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली असून, जखमींपैकी काहींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.



सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणि कारवाई सुरू करण्यात आली आहे. हल्लेखोरांचा शोध सुरू असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही, असे स्थानिक पोलिसांनी ‘एक्स’वर म्हटले आहे. तसेच या हल्ल्यामागील हेतू आणि घटनेमागील नेमकी परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.


मिळालेल्या माहितीनुसार, ‘आराऊ रेव्ह’ या कार्यक्रमादरम्यान रविवारी पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या काही मिनिटे आधी गोळीबार झाला. हा वार्षिक टेक्नो पार्टीचा कार्यक्रम शनिवारी दुपारी 3 वाजता सुरू झाला होता आणि रविवारी पहाटे 2 वाजेपर्यंत सुरू होता. या भव्य कार्यक्रमाला सुमारे 3,500 लोक उपस्थित होते.


पोलिस प्रवक्त्या व्हेनेसा रुम्पोल्ड यांनी सांगितले की, कार्यक्रमाचे आयोजन ज्या रेसकोर्सवर करण्यात आले होते, तिथेच गोळीबाराची घटना घडली. लोकांच्या मोठ्या गर्दीत अनेक राऊंड गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीनेही गोळ्यांचा अक्षरशः वर्षाव झाल्याचे सांगितले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू आहे.
Comments
Add Comment

WhatsApp : परदेशात गेल्यावर सिम कार्डची कटकट कायमची बंद होणार? व्हॉट्सॲप आणतंय 'हे' धमाकेदार फीचर!

परदेश प्रवास करणार्‍यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. जगभरात मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरल्या

Germany Strange Rules: बागेत बाकावर बसून रडणाऱ्या महिलेला दंड! जर्मनीतील अजब नियम चर्चेत

Germany Strange Rules: कधीकधी, आपण एकटे असतो, अस्वस्थ वाटत असते, तेव्हा कोणाशीतरी बोलण्याऐवजी थोडा वेळ एकटे बसावेसे वाटते.

16 डिसेंबरपूर्वी बांगलादेशात महाभूकंप! हसीनांच्या निकटवर्तीयांना अटक; 108 तुकड्या तैनात झाल्याने खळबळ

ढाका : माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बांगलादेशात परतण्याच्या नियोजित दौऱ्याला काहीच काळ शिल्लक असताना, तारिक

इंडोनेशियात बेकायदा सोन्याच्या खाणीत पाणी शिरलं; 13 कामगारांचा मृत्यू, 13 बेपत्ता

इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात एका अनधिकृत सोन्याच्या खाणीत पाणी शिरल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या

पोलिश तरुणी वंदे भारत पाहून थक्क! चहा-पोह्याचा आस्वाद घेत रचला व्हायरल व्हिडिओ; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव!

भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचा आणि बदलत्या स्वरूपाचा अनुभव आता परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालत आहे. पोलंडमधील एका

Senator speech holding 6 month baby parliament : ६ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सिनेटरचे संसदेत भाषण; लिडिया थॉर्पसोबत चिमुकलीचा लपाछपीचा खेळ, भावूक व्हिडिओ व्हायरल

मुंबई : राजकीय सभागृहाचे कामकाज म्हटले की तणावपूर्ण चर्चा, खडाजंगी आणि कडक शिस्त असेच चित्र नेहमी पाहायला मिळते.