Eknath Shinde : डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांसह महिला व युवकांच्या पाठीशी खंबीर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

परभणी : राज्यातील शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणी व युवकांच्या पाठीशी केंद्र व राज्यातील हे डबल इंजिन सरकार खंबीरपणे उभे राहील व विकास कामांकरीता निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रविवारी परभणीत आयोजित केलेल्या शेतकरी व युवा संवाद मेळाव्यातून दिली.


येथील स्टेडिअम मैदानावर शिवसेनेच्या वतीने रविवारी दुपारी शेतकरी व युवक संवाद मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे, राज्याचे वित्त व राज्य मंत्री आशिष जयस्वाल, संयोजक तथा खासदार संजय जाधव, खासदार संजय देशमुख, माजी आमदार शंकरराव धोंडगे, आमदार हिकमतराव उढान, शिवसेनेचे संपर्क प्रमुख आनंद जाधव, आमदार सईद खान, जालना जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे, परभणी जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, जिल्हा प्रमुख विशाल कदम, माजी खासदार सुरेश जाधव, माजी आमदार हरिभाऊ लहाने, परभणीचे प्रथम महापौर प्रताप देशमुख, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख भास्कर लंगोटे, संपर्कप्रमुख राजू कापसे यांच्यासह अन्य मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते.


सरकारच्या तिजोरीवर सर्वसामान्य शेतकर्यांचा पहिला हक्क व अधिकार आहे, असे नमूद करीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महायुती सरकारने आपल्या कारकिर्दीत सातत्याने शेतकरी हिताचेच निर्णय घेतले आहेत. शेतकरी सन्मान योजनेतून राज्य व केंद्रातील डबल इंजिन सरकारने प्रतिवर्षी 12 हजार रुपयांचे अनुदान शेतकर्यांच्या खात्यात जमा केले आहेत. मायबाप शेतकर्यांच्या आपत्तींतसुध्दा हे सरकार शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अलिकडे महायुती सरकारने अहिल्याबाई होळकर कर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या योजनेतूनच परभणी जिल्ह्यात 508 कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे, अशी माहिती दिली.


राज्य व केंद्रातील सरकार शेतकर्यांना कधीही वार्यावर सोडणार नाही, शेतकर्यांच्या अडी अडचणीत हे सरकार निश्चितपणे शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.



महिलांकरीताही या सरकारने बहुतांशी निर्णय घेतले आहेत. त्याद्वारे महिलांचा सन्मान वाढावा या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. लाडकी बहिण सारखी योजना महिलांना सन्मान देणारी ठरली आहे. या लाडक्या बहिणी लखपती व्हाव्यात, या दृष्टीनेही हे सरकार निश्चितपणे प्रयत्न करणार आहे, असे स्पष्ट करतेवेळी शिंदे यांनी महिलांचा आत्मसन्मान राखला जाईल, अशी ग्वाही दिली.


राज्यातील युवकांनाही मोठ्या प्रमाणावर कामे मिळावीत या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. विशेषतः युवा शक्तीत मोठी ताकद आहे. युवक कष्टाळू आहेत. या युवकांना संधी मिळाली पाहिजे, ती संधी निश्चितपणे दिली जात आहे. युवकांच्या कौशल्य विकासाकरीता सारे प्रयत्न सुरु आहेत. स्टार्टअप, पॅकेजींग वगैरेसारख्या गोष्टींना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले जात आहे. एआयच्या माध्यमातून भविष्यात युवकांना मोठ्या प्रमाणावर काम मिळणार आहे. युवकांच्या पाठीशी हे सरकार निश्चितच खंबीरपणे उभे राहील, असे ते म्हणाले. युवकांनी चेंजमेकर बनले पाहिजे, बदल घडविले पाहिजे, नोकरीच्या मागे लागण्याऐवजी नोकरी देणारे बनले पाहिजे, असे आवाहनही केले.



विकासाची पर्वणी घेऊन येऊ...


परभणी शहरासह जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. या सर्व प्रश्नांची हे सरकार निश्चितपणे दखल घेऊ लागले आहे. ‘जगात जर्मनी, भारतात परभणी’ या म्हणीप्रमाणे परभणी प्रत्यक्षात साकार व्हावी, या दृष्टीने हे सरकार मोठ्या प्रमाणावर पाऊले उचलील असा विश्वास व्यक्त करतेवेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी परभणी जिल्ह्यातील पायाभूत सुविधांसह विकासाकरीता दीड हजार कोटींच्या योजना आणल्या आहेत. यातून कृषि क्षेत्रातील जोडधंदे, शेतीच्या तंत्रास प्रोत्साहन, प्रक्रिया उद्योग, बाजारपेठ वगैरेंना प्रोत्साहन दिले जाणार आहे. परभणी महानगरांतर्गत रस्ते, नाल्या, पाणी पुरवठा, घनकचरा या प्रकल्पांना सर्वतोपरि निधी दिला जाईल. या व्यतिरिक्त नवीन एमआयडीसीचा प्रश्न तात्काळ मार्गी लावला जाईल, जिल्हा क्रिडा संकुलासाठी जागा उपलब्ध केली जाईल, कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी तात्काळ केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी