तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात का? तर थांबा! शिळा भात फेकून न देता त्यापासून अत्यंत सोपा, झटपट आणि नेहमीपेक्षाही चविष्ट नाश्ता तयार करता येतो. अन्न वाया घालवण्याऐवजी असा चटपटीत आणि पौष्टिक नाश्ता बनवून तुम्ही कुटुंबाला एक मस्त सरप्राइज देऊ शकता!
या रेसिपीसाठी लागणारे साहित्य
- 1 कप उरलेला शिजवलेला भात
- 1/4 कप बेसन
- 2½ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
- 1 टीस्पून लाल तिखट
- 1/4 टीस्पून हळद
- चिमूटभर बेकिंग सोडा
- मीठ
- 3/4 कप पाणी
- तळण्यासाठी तेल
भाताची पेस्ट तयार करा
भातात थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये अगदी बारीक पेस्ट करून घ्या.भाताच्या पेस्टमध्ये बेसन, कॉर्नफ्लोअर, तिखट, हळद, मीठ आणि बेकिंग सोडा घालून गुळगुळीत बॅटर तयार करा. बॅटर ना खूप घट्ट, ना खूप पातळ. बाटलीतून सहज बाहेर पडेल असा घट्टपणा ठेवा.
Instant Sweet Recipes for Festivals : सणासुदीच्या दिवसात घरच्या घरी बनवा या इन्स्टंट मिठाईचे प्रकार; कमी वेळात तयार होईल गोड मेजवानी!
मुंबई : सणासुदीचे दिवस सुरू झाले की घरात गोडधोड पदार्थ बनवण्याची लगबग सुरू होते. गणेशोत्सव, गौरी-गणपती, नवरात्र किंवा दिवाळी असो, पाहुण्यांच्या ...
बाटलीत भरा
हे मिश्रण स्क्विझ बाटली किंवा स्वच्छ प्लास्टिकच्या बाटलीत भरा. मध्यम गरम तेलात बाटली दाबून पातळ पट्ट्या सोडा आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
मसाल्याचा ट्विस्ट
एका भांड्यात चाट मसाला, लाल तिखट आणि थोडा लिंबाचा रस मिसळा. तळलेले राईस क्रिस्प्स मसाल्यात हलक्या हाताने टॉस करा आणि संध्याकाळच्या चहासोबत कुरकुरीत स्नॅकचा आनंद घ्या.






