Monday, August 31, 2026

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आंदोलकांवर तीव्र टीका केली आहे. तसेच राष्ट्रध्वजाचा आणि भारताचा अपमान सहन करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Kiren Rijiju)

सरसंघचालक मोहन भागवत हे अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटन या तीन देशांच्या जागतिक संपर्क दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात न्यूयॉर्क येथे पोहोचले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक संस्थांच्या निमंत्रणावरून ते या आठवड्याच्या सुरुवातीला न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले. मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथील भागवतांचे संबोधन झाले. भागवतांच्या या दौऱ्याला खलिस्तान समर्थक आणि इतर असामाजिक शक्ती विरोध करीत आहेत. गेल्या 29 ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कच्या मॅडिसन क्वेअर गार्डनमध्ये सरसंघचालकांचे उद्बोधन सुरू असताना सिख ऑफ जस्टीस (एसएफजे) संघटनेच्या लोकांनी भारत विरोधी घोषणा देत राष्ट्रध्वजाचा अपमान केला. या निदर्शनांचा एक व्हिडिओ रिजिजू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शेअर केला असून, त्यात भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान होताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. (Kiren Rijiju)

रिजिजू म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप किंवा सरकारवर टीका करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. मात्र देश आणि राष्ट्रध्वजाचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.व्हिडिओ शेअर करताना रिजिजू म्हणाले की, आरएसएस, भाजप किंवा सरकारवर टीका करण्याचे तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. मात्र, आपल्या देशाला अपशब्द बोलू नका. आमच्या राष्ट्रध्वजाचा आणि माझ्या देशाचा अपमान करू नका. त्याची तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल असे रिजिजू यांनी बजावले आहे. (Kiren Rijiju)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा