मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी मोठी दुर्घटना घडली. या घटनेत क्रेनला आग लागली असून दोन क्रेन ऑपरेटर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. (Mumbai Port Crane Accident)
https://www.prahaar.in/2026/08/30/chief-minister-assures-a-way-forward-on-the-maratha-agitation-issue/कार्गो उचलत असताना एका क्रेनला कार्गोशी जोडलेला पट्टा (स्ट्रॅप) इम्बॅलन्स झाल्याने निघून गेला. त्यामुळे कार्गोचा संपूर्ण भार दुसऱ्या क्रेनवर आला. अचानक वाढलेल्या वजनामुळे संबंधित क्रेन जमिनीपासून वर उचलली गेली आणि तिचा पुढील टेलिस्कोपिक बूम वेसलवर आदळला. या धडकेत झालेल्या घर्षणामुळे क्रेनला आग लागली. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोर्ट अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि तत्काळ आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. (Mumbai Port Crane Accident)
https://www.prahaar.in/2026/08/30/the-neet-pg-exam-was-conducted-under-tight-security-and-direct-hands-on-supervision/या दुर्घटनेत ‘बरकत’ कंपनीच्या क्रेनमधील क्रेन ऑपरेटर रणजीतसिंग आणि निशांत सिंह हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. दरम्यान, या घटनेची चौकशी सुरू असून दुर्घटनेमागील नेमके कारण आणि सुरक्षेतील त्रुटींचा तपास केला जात आहे. (Mumbai Port Crane Accident)
View this post on Instagram






