Monday, August 31, 2026

Nashik Trimbakeshwar News : तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी भाविकांची गर्दी

Nashik Trimbakeshwar News : तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी भाविकांची गर्दी

Nashik Trimbakeshwar News : श्रावण सोमवारनिमित्त विविध शिव मंदिरात भाविक गर्दी करताना दिसून येत आहे. तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी रविवारी हजारो भाविकांनी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे गर्दी केली आहे. भाविकांनी रात्री ८ वाजेपासूनच कुशावर्तावर स्नान करत ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला सुरुवात केली होती. यावेळी ‘बम बम भोले’ च्या जयघोषाने संपूर्ण त्र्यंबकनगरी दुमदुमून गेल्याचं पहायला मिळालं.

ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावर कडेकोट बंदोबस्त

प्रदक्षिणेसाठी ब्रह्मगिरी मार्गावर भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावर जागोजागी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. सोबतच खासगी वाहनांना शहरात प्रवेश नाकारण्यात आला होता. ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी काही भाविक मध्यरात्रीपासूनच मार्गस्थ झाले, तर काही भाविक पहाटे प्रदक्षिणेला रवाना झाले. त्र्यंबकेश्वर येथे आल्यानंतर विश्रांती, स्नान, देवदर्शन आणि त्यानंतर प्रद‌क्षिणेसाठी जाण्याचे नियोजन अनेक भाविकांनी केल्याचे दिसून आले.

दरम्यान, भाविकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांकडून शहरातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. कुंभमेळा बसस्थानक, जव्हार रोड, पोलीस ठाणे मार्गे सुंदराबाई मठ आणि त्यानंतर कुशावर्त तीर्थ असा भाविकांच्या हालचालींचा मार्ग निश्चित करण्यात आला असून, मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाविक ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या मार्गावर जात आहेत. प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने देखील ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावर जागोजागी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >