Ankit Baliyan Murder : शामलीत अंकित बलियान हत्या प्रकरणातील दोन संशयित चकमकीत ठार; पोलीस कर्मचारीही जखमी

शामली :  उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात हरियाणवी गायक आणि यूट्यूबर अंकित बलियान यांच्या हत्या प्रकरणातील दोन संशयितांची पोलिसांशी चकमक झाली. सोमवारी पहाटे पानिपत-कैराना महामार्गावर झालेल्या या कारवाईत पोलिसांनी मोहित आणि सुमित या दोघांना ठार केले. चकमकीदरम्यान एक पोलीस अधिकारी जखमी झाल्याची माहिती आहे. अंकित यांच्या हत्येची जबाबदारी गोगी गँगने स्वीकारली होती. ( Ankit Baliyan)



शामलीचे एसपी एन. पी. सिंग यांच्या माहितीनुसार, पहाटे सुमारे 4 वाजता अंकित बलियान हत्या प्रकरणातील दोन संशयित शामलीच्या दिशेने येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर विविध पोलीस पथकांनी त्यांचा शोध सुरू केला. पोलिसांना चकमा देत आरोपी मन्ना माजरा परिसराकडे पळाले. हॉटेल राजमहालजवळ त्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. यातील एक गोळी पोलिसांच्या वाहनाला लागली. (Murder)


यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन्ही संशयित जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृतांची ओळख धर्मपाल येथील सुमित आणि हरियाणातील सोनीपतच्या राजडा गावातील मोहित अशी करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही उपचार सुरू आहेत. ( Ankit Baliyan Murder)


दरम्यान, अंकित बलियान यांची हत्या काही दिवसांपूर्वी शामलीच्या कोतवाली परिसरात एका जिमबाहेर करण्यात आली होती. जिममधून बाहेर पडून कारकडे जात असताना दोन मोटरसायकलवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गंभीर जखमी झालेल्या अंकित यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला होता.


अंकित यांच्या पत्नी सीमा यांनी पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त केली होती. मारेकऱ्यांना चार दिवसांत अटक न झाल्यास आत्महत्या करण्याची धमकी त्यांनी दिली होती. तसेच अंकित यांनी पोलीस संरक्षण मागितले होते, मात्र ते मिळाले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. (UP murder Case)


या घटनेनंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अंकित यांच्या वडिलांशी फोनवर संवाद साधून कुटुंबाला न्यायाच्या लढाईत साथ देण्याचे आश्वासन दिले. आता चकमकीत ठार झालेल्या संशयितांचा हत्येशी नेमका काय संबंध होता, याचा तपास पोलीस करत आहेत.


Comments
Add Comment

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने वडिलांसोबत शेअर केले खास क्षण; कॅप्शन एकदा पहाच...

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने सोशल मीडियावर एका नवीन पोस्टद्वारे आपले वडील सलीम खान यांच्यासोबतच्या नात्याची

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Ashish Shelar: दिवंगत नाना पाटेकरांना भाजपने दिली होती लोकसभा लढवण्याची ऑफर, मंत्री आशिष शेलार यांचा दावा

 देवेंद्र फडणवीसांसोबत स्वतः भेट घेतल्याची सांगितली आठवण मुंबई : दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांना भाजपकडून

New Mahindra Car Launch: महिंद्राची नवी CNG SUV बाजारात! पाहा किंमत, फीचर्स आणि मायलेज

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर भारतीय बाजारात महिंद्रा कंपनीने आपल्या ताफ्यात सीएनजी गाडी लाँच केली आहे. XUV 3XO CNG ही

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सामना पराभवाचा वेग काही भलताच, आतापर्यंत सर्व भारतीय कर्णधारांना टाकलं मागे

[caption id="attachment_1066530" align="aligncenter" width="800"] वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि मालिका विजयाचं गणित