Ahilyanagar : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत अर्थात एसआयआर पडताळणीत जिल्ह्यातील तब्बल ४ लाख २६ हजार ९३० मतदार असंकलित आढळले आहेत. यामध्ये मयत, दुबार तसेच कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांचा समावेश आहे. या मतदारांची नावे वगळल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील ३३ लाख ८३ हजार १८७ मतदारांची प्रारूप मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
एसआयआर अंतर्गत जिल्ह्यातील एकूण ३८ लाख १० हजार मतदारांची पडताळणी करण्यात आली. त्यापैकी ४ लाख २६ हजार ९३० म्हणजेच ११.२२ टक्के मतदार असंकलित आढळून आले. त्यामुळे आता प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीतून या मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना दावे आणि हरकती दाखल करण्याची संधी देण्यात आली आहे. ३१ ऑगस्टपासून ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार आहेत. दाखल झालेल्या दावे-हरकतींचे निराकरण २९ ऑक्टोबरपर्यंत करण्यात येणार असून, त्यानंतर ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. (Ahilyanagar News)
Nashik : नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भक्ष्याच्या शोधात आलेल्या एका बिबट्याने चक्क तालुक्यातील (Peth Taluka) हरणगाव शिवारातील ...
संकेतस्थळावर मतदार यादी तपासता येणार
मतदारांना निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मतदार यादी तपासता येणार आहे. तसेच आपल्या भागातील बीएलओ अर्थात बूथ लेव्हल ऑफिसरकडूनही मतदार यादीची माहिती घेता येणार आहे. मतदार यादीतील आपले नाव, नावाचे स्पेलिंग, वय किंवा जन्मतारीख, छायाचित्र, पत्ता, मतदार क्रमांक तसेच मतदान केंद्राची माहिती योग्य आहे का, याची मतदारांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मतदार यादीत नाव आढळून न आल्यास किंवा काही माहिती चुकीची असल्यास संबंधितांना दावे-हरकती दाखल करता येणार आहेत. नवीन नाव नोंदणी करण्यासाठी किंवा वगळलेले नाव पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी नमुना क्रमांक ६, आवश्यक कागदपत्रे आणि घोषणापत्रासह अर्ज करावा लागणार आहे.
दरम्यान, सुनावणीच्या वेळी कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. तसेच तालुकास्तरावर समन्वयासाठी तालुकास्तरीय अधिकारी किंवा त्यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेला स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. असंकलित मतदारांमध्ये मयत, दुबार आणि कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांचा समावेश आहे. या मतदारांशी संबंधित आवश्यक माहिती बीएलओंनी जतन करून ठेवावी, तसेच प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नमुना क्रमांक ६, ७ आणि ८ पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. प्रारूप मतदार यादीनुसार जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ३३ लाख ८३ हजार १८७ मतदार आहेत. (Ahilyanagar News)
Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस , शुभेच्छांचा वर्षाव, नातेवाईकांची लगबग क्षणात ...
३० सप्टेंबरपूर्वी हरकती दाखल करण्याचे आवाहन
एसआयआर पडताळणीत जिल्ह्यातून वगळण्यात आलेल्या मतदारांमध्ये १ लाख ४१ हजार २१२ मयत मतदार, ५० हजार १६७ गैरहजर मतदार, १ लाख ७१ हजार ७१९ कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार आणि १ हजार १२५ इतर मतदारांचा समावेश आहे. याशिवाय यापूर्वी नोंदणी झालेले ६२ हजार ७०७ मतदार देखील या प्रक्रियेत वेगळे करण्यात आले आहेत. त्यामुळे आता प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्येक मतदाराने आपले नाव आणि मतदार यादीतील तपशील तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे. नाव वगळले गेले असल्यास किंवा माहितीमध्ये काही त्रुटी असल्यास ३० सप्टेंबरपूर्वी दावे-हरकती दाखल करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.