Rohit Sharma New Reality Show : क्रिकेटच्या मैदानावर सिक्सर मारणारा हिटमॅन आता टेलिव्हिजनचा TRP वाढवणार, रोहित शर्माचा नवा रिऍलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सर्वांचा लाडका 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटर रोहित शर्मा टीव्हीवर एक नवा रिएलिटी शो घेऊन येत आहे. रोहित शर्माच्या नव्या शोची घोषणा काही महिन्यांपूर्वीच झाली होती. रोहितनेही आपण लवकरच टीव्हीवर येत असल्याचं जाहीर केलं होतं. आता अखेर त्याच्या या शोची प्रतीक्षा संपली आहे. त्याचबरोबर या त्याच्या शोचं नाव आणि रिलीज डेटही समोर आली आहे. (Rohit Sharma New Reality Show)


रोहित शर्माचा हा शो फॅमिली शो असणार आहे. हा संपूर्ण कुटुंबासोबत एकत्र बसून पाहण्यासारखा एक मनोरंजक शो असेल, जो सर्व वयोगटातील प्रेक्षकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. या शोचा प्रोमो समोर आला आहे व त्याने सर्वांचंच विशेष लक्ष्य वेधलंय. (Rohit Sharma New Reality Show)



शोच्या प्रोमोमध्ये रोहितचे प्रसिद्ध 'गार्डन' आणि 'गल्ली क्रिकेट'शी संबंधित संवाद ऐकायला मिळत आहेत. प्रोमोमध्ये चाहते रोहितला त्याचा व्हायरल 'गार्डन'मधील डायलॉग पुन्हा बोलण्याची विनंती करताना दिसतात. रोहितचा हा डायलॉग भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट मॅचदरम्यान व्हायरल झाला होता. त्यावेळी तो त्याच्या फिल्डर्सना वेगाने हालचाल करायला सांगत होता, तेव्हाच त्याच्या तोंडून 'कोणीही गार्डनमध्ये फिरणार नाही' हा डायलॉग बाहेर पडला होता. त्यानंतर सोशल मीडियावर यावरून अनेक मीम्स आणि चर्चा रंगल्या होत्या. (Rohit Sharma New Reality Show)


प्रोमोमध्ये हाच डायलॉग बोलण्याची सगळे त्याला विनंती करत असताना यावर त्रस्त होऊन रोहित म्हणतो की, "फक्त दोन ओळी काय म्हटल्या, त्या इतक्या व्हायरल झाल्या; जर पूर्ण शोच समोर आला तर काय होईल कोण जाणे."



रोहितचा हा शो म्हणजे एक फॅमिली रिएलिटी गेम शो आहे. या शोचं नावच आहे, 'फॅमिली फुल हाऊस विथ रोहित शर्मा'. याच महिन्यापासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोनी टीव्हीवर १९ सप्टेंबर २०२६ पासून तो सुरू होणार आहे. या शोच्या माध्यमातून रोहित पहिल्यांदाच टीव्ही एंटरटेनरच्या भूमिकेत दिसणार आहे. (Rohit Sharma New Reality Show)

Comments
Add Comment

Madhuri Dixit: 'धक धक गर्ल'चा गुलाबी साडीत घायाळ करणारा लूक, पाहा Photos

[caption id="attachment_1067345" align="aligncenter" width="800"] अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपल्या सौंदर्याच्या जोरावर बॉलिवूड इंडस्ट्रीवर अधिराज्य

सिद्धु मुसेवालाच्या छोट्या भावामुळे आई- वडिलांविरोधात तक्रार दाखल, नेमकं काय घडलं?

मुंबई: प्रसिद्ध पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धु मुसेवाला आज या जगात नाही, जरीही तो आज आपल्यात नसला तरीही तो त्याच्या

रेशनवरून वाद, नॉमिनेशनचा फटका! नकुलनंतर आता कोणाची होणार बिग बॉसच्या घरातून एक्झिट?

कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय शो 'बिग बॉस २०' हा स्पर्धकांमधील अटीतटीच्या स्पर्धेमुळे आणि घरातील वादांमुळे सतत

Radhika Apte New Series: रहस्य, थरार आणि सत्तेचा खेळ! राधिका आपटेच्या ‘अक्का’ची पहिली झलक समोर

अभिनेत्री राधिका आपटे आणि कीर्ती सुरेश लवकरच ‘अक्का’ या आगामी सीरिजमध्ये एकत्र दिसणार आहेत. 1980 च्या दशकातील

Sita As A Warrior : 'रामायण' चित्रपटाच्या नव्या प्रोमोत साई पल्लवीचा धडाकेबाज ॲक्शन अवतार; प्रेक्षकांनी मानले दिग्दर्शकाचे आभार

मुंबई : रणबीर कपूर, (Ranbir Kapoor) यश (Yash) आणि साई पल्लवी (Sai Pallavi) यांची प्रमुख भूमिका असलेला 'रामायण' (Ramayan) हा चित्रपट सध्या

Kareena-Saif Love Story : ...तर माझे किती पैसे वाचले असते, करीनाला असं का म्हणाला सैफ अली खान ?

Kareena And Saif : बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांमध्ये करीना कपूर आणि सैफ अली खान यांचे नाव आवर्जून घेतले जाते. लग्नाला १४