Jalgaon : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात सुरू असलेल्या अवैध वेश्याव्यवसायाचा रामानंदनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कुंभारवाड्यासमोरील एका बंगल्यात सुरू असलेल्या या प्रकारावर पोलिसांनी डमी ग्राहकाच्या मदतीने सापळा रचत धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी चार पीडित महिलांची सुटका केली असून, तीन ग्राहक आणि एका पंटरला ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे पिंप्राळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Jalgaon Crime News)
Jalgaon Accident News : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर बिलाखेड गावाजवळ हा भीषण अपघात झाला. भरधाव कारने ...
नेमकं काय घडलं ?
पिंप्राळा परिसरातील कुंभारवाड्यासमोरील एका बंगल्यात अवैध पद्धतीने वेश्याव्यवसाय (Prostitution) सुरू असल्याची गुप्त माहिती रामानंदनगर पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची खातरजमा करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने एका डमी ग्राहकाला संबंधित बंगल्यावर पाठवले. डमी ग्राहकाच्या माध्यमातून बंगल्यात प्रत्यक्षात वेश्याव्यवसाय सुरू आहे का, याची खात्री करण्यात आली. बंगल्यात अवैध प्रकार सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर डमी ग्राहकाने पोलिसांना ठरल्याप्रमाणे मिस्ड कॉल करून कारवाईचा संकेत दिला. (Jalgaon Crime News)
Jalgaon Crime : धावत्या रेल्वेच्या डब्यात दिवा लावून धार्मिक विधी करणाऱ्या प्रवाशाविरुद्ध मध्य रेल्वेने कारवाई केली आहे. उघड्या ज्योतीमुळे डब्याला आग ...
४ पीडित महिलांची सुटका
संकेत मिळताच आधीपासून दबा धरून बसलेल्या पोलिसांच्या पथकाने तातडीने बंगल्यावर छापा टाकला. अचानक पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे तेथे उपस्थित असलेल्यांची चांगलीच धावपळ उडाली. छाप्यादरम्यान पोलिसांना घटनास्थळी चार पीडित महिला, तीन ग्राहक आणि एक पंटर आढळून आला. पोलिसांनी चारही पीडित महिलांची सुटका केली असून, त्यांना पुढील प्रक्रियेसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात एका महिलेसह दोन पुरुषांचा या अवैध वेश्याव्यवसायाच्या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली असून, या संपूर्ण रॅकेटमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे. (Jalgaon Crime News)
Jalgaon Crime : अपहरण करून गुंगीचे औषध पाजल्याचा, बेशुद्धावस्थेत आळंदी येथे विवाह लावल्याचा आणि पुण्यात अत्याचार केल्याचा आरोप करत एका तरुणासह त्याच्या ...
रामानंदनगर पोलिसांकडून तपास सुरु
दरम्यान, जळगाव शहरात अशा प्रकारे अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांकडून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. विशेषतः महिलांचे शोषण करणाऱ्या आणि त्यांना या व्यवसायात ढकलणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे. या कारवाईनंतर जळगाव शहरातील अवैध वेश्याव्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास रामानंदनगर पोलीस ठाणे (Ramanandnagar Police Station) आणि संबंधित पथकाकडून सुरू असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच या व्यवसायाचे जाळे किती मोठे आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.






