Wednesday, September 2, 2026

Janhavi Killekar New Brand : अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने सुरू केला नवा प्रवास; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून दिली माहिती

Janhavi Killekar New Brand : अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने सुरू केला नवा प्रवास; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून दिली माहिती

मुंबई : जान्हवी किल्लेकरच्या चाहत्यांसाठी खास बातमी! ‘बिग बॉस मराठी’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आता फॅशनच्या क्षेत्रात नवी इनिंग सुरू करत आहे. जान्हवीने स्वतःचा फॅशन ब्रँड लाँच केला असून, याबाबतचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Janhavi Killekar New Brand)

जान्हवी किल्लेकरने सुरू केला नवा प्रवास :

जान्हवी किल्लेकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अभिनयासोबतच तिच्या स्टायलिश लुक्स आणि फॅशन सेन्सचीही नेहमीच चर्चा होत असते. विविध आउटफिट्समधील फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. अनेक ब्रँड्सच्या प्रमोशनमध्येही ती सहभागी होताना दिसते. आता फॅशनमधील हीच आवड तिने व्यवसायाच्या रूपात पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. जान्हवीने ‘नमः बाय जान्हवी’ (NAMAH by Janhavi) या नावाने स्वतःचा फॅशन ब्रँड सुरू केला आहे. (Janhavi Killekar New Brand)

सिद्धिविनायकाचे दर्शन घेत ब्रँडची सुरुवात :

जान्हवीने मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेत आपल्या नव्या ब्रँडच्या प्रवासाची सुरुवात केली. यानंतर तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आपल्या नव्या उपक्रमाची माहिती दिली. व्हिडीओ शेअर करत जान्हवीने लिहिलं, “लवकरच घेऊन येतेय.... @namah_by_jahnavi. स्टाईल जी ऑफिसपासून रोजच्या आयुष्यापर्यंत तुमची साथ देईल…” (Janhavi Killekar New Brand)

‘फक्त ब्रँड नाही, तर एक भावना’ :

व्हिडीओमध्ये जान्हवी आपल्या नव्या ब्रँडबद्दल सांगताना म्हणते की, “एक नवीन सुरुवात, एका नवीन स्वप्नाची. तुमच्या सौंदर्याला, तुमच्या व्यक्तिमत्त्वाला आणि तुमच्या स्टाईलला एक नवीन ओळख देण्यासाठी मी जान्हवी तुम्हा सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे ‘नमः बाय जान्हवी’.” पुढे ती म्हणते की, प्रत्येक व्यक्तीची स्टाईल खास असते आणि तीच खासियत जपण्यासाठी हा ब्रँड सुरू केला आहे. ‘नमः बाय जान्हवी’ हा केवळ ब्रँड नसून एक भावना, एक स्वप्न आणि नवी ओळख आहे, असंही जान्हवीने सांगितलं. (Janhavi Killekar New Brand)

लवकरच या ब्रँडच्या माध्यमातून विविध प्रकारचे स्टायलिश कपडे ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे तिने सांगितले आहे. जान्हवीच्या या नव्या प्रवासासाठी चाहत्यांकडूनही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (Janhavi Killekar New Brand)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >