Nashik Crime News : नाशिकच्या वाघाडी परिसरातून अंमली पदार्थांविरोधातील पोलिस कारवाईची मोठी बातमी समोर आली आहे. वाल्मीक नगरमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून तब्बल १०० ग्रॅम एमडी म्हणजेच मॅफेड्रॉन जप्त केले आहे. या एमडीची अंदाजे किंमत तीन लाख रुपये आहे. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच संशयित घटनास्थळावरून पसार झाला. वाघाडीतील सैलानी बाबा चौकाजवळील वाल्मीक नगर येथे ही कारवाई करण्यात आली. (Nashik Crime News)
Nashik Crime News : नाशिकच्या सातपूर परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. सातपूर परिसरातील संताेषी माता मंदिराच्या परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलास जवळ ...
३ लाखांचे १०० ग्रॅम एमडी जप्त
रवी राजू भालेराव असे फरार संशयिताचे नाव असून, तो आपल्या घरातून अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांच्या नेतृत्वाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी दुपारी भालेरावच्या घरावर छापा टाकला. दुपारी २ वाजून ४० मिनिटांपासून सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांपर्यंत घराची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान पोलिसांना फिकट तपकिरी रंगाचा आणि उग्र वास असलेला स्फटिकजन्य पदार्थ आढळून आला. त्याची घटनास्थळीच फॉरेन्सिक पथकाने प्राथमिक तपासणी केली. (Nashik Crime News)
या तपासणीत सदर पदार्थ मॅफेड्रॉन म्हणजेच एमडी असल्याचे निष्पन्न झाले. इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर वजन केल्यानंतर तब्बल १०० ग्रॅम एमडी आढळून आले. पोलिसांनी त्याची अंदाजे बाजारपेठेतील किंमत तीन लाख रुपये असल्याचे सांगितले. दरम्यान, पोलिसांची कारवाई सुरू होण्यापूर्वीच संशयित रवी भालेराव पसार झाला. पोलिसांनी जप्त केलेले एमडी आणि पॅकिंगसाठी वापरण्यात आलेल्या पारदर्शक तसेच काळ्या रंगाच्या पिशव्या फॉरेन्सिक नियमानुसार सीलबंद केल्या आहेत. (Nashik Crime News)
Nashik : पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमानंतर काँग्रेसचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे बुधवारी नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. संघटन ...
पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलिस हवालदार भारत गेणू डंबाळे यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात (Panchavati Police Station) एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, फरार संशयिताचा शोध सुरू आहे. पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलिस आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली.






