Wednesday, September 2, 2026

Nashik Crime : चाकूचा धाक अन् अल्पवयीन मुलासोबत अश्लील कृत्य, नाशिकमध्ये खळबळ

Nashik Crime : चाकूचा धाक अन् अल्पवयीन मुलासोबत अश्लील कृत्य, नाशिकमध्ये खळबळ

Nashik Crime News : नाशिकच्या सातपूर परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. सातपूर परिसरातील संताेषी माता मंदिराच्या परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलास जवळ बोलावून त्याच्या गळ्यात हात टाकत चाकूचा धाक दाखवून अश्लिल कृत्य व धमकावल्याची घटना समाेर आली आहे. या प्रकरणी सातपूर पाेलीस ठाण्यात (Satpur Police Station) पाेक्साेसह भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime News)

सागर तुकाराम शिंगाडे (वय २५, रा. संतोषी मंदिराजवळ, सातपूर, नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. तर संशयिताचा भाऊ देखील पाेलीस दप्तरी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, संशयिताने विकृती आणि परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचे तपासात समाेर येत आहे. (Nashik Crime News)

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी (दि. २९) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास फिर्यादीचा १४ वर्षांचा मुलगा घरासमोर मित्रांसोबत उभा होता. याच दरम्यान संशयित सागर शिंगाडे याने मुलाला बोलावले. संतापजनक म्हणजे सागर शिंगाडे याने अल्पवयीन मुलाच्या गळ्यात हात टाकून, खिशातून चाकू काढून त्याचा धाक दाखवत मला तू खूप आवडतो, मला पप्पी दे, अशी अश्लिल मागणी केली वआणि भीतीचे वातावरण निर्माण केले. (Nashik Crime News)

घाबरलेल्या मुलाने तात्काळ आरडाओरड केल्याने संशयित त्या ठिकाणाहून पसार झाला. मात्र, धक्कादायक म्हणजे काही वेळाने तो मुलगा घरासमोर उभा असताना संशयिताने पुन्हा त्याच्याजवळ येण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा आधी तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >