मुंबई : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार सुरू असून, मंगळवारी झालेल्या वाढीनंतर बुधवारी बाजारात सोन्याच्या दरात मोठी कपात झाली. 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम तब्बल ₹2,070 ची घसरण झाली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ( Gold Price Today)
24 कॅरेट सोन्याचा दर ₹2,070 ने कमी होऊन प्रति 10 ग्रॅम ₹1,52,020 वर आला आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात ₹1,900 ची घसरण झाली असून, त्याचा भाव प्रति 10 ग्रॅम ₹1,39,350 इतका झाला आहे. 18 कॅरेट सोन्याचाही दर कमी झाला आहे.
Bhiwandi News : शोध घेतला, तक्रारही केली... अन् अखेर लिफ्टच्या डकमध्ये सापडला महिलेचा मृतदेह; नक्की काय घडलं?
ठाणे : भिवंडीत बेपत्ता झालेल्या 54 वर्षीय महिलेचा मृतदेह एका इमारतीच्या लिफ्टच्या डक्टमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मोबाईल लोकेशनच्या आधारे ...
24 कॅरेट सोन्याचा भाव
1 ग्रॅम - ₹15,202
8 ग्रॅम - ₹1,21,616
10 ग्रॅम - ₹1,52,020
100 ग्रॅम - ₹15,20,200
22 कॅरेट सोन्याचा भाव
1 ग्रॅम - ₹13,935
8 ग्रॅम - ₹1,11,480
10 ग्रॅम - ₹1,39,350
100 ग्रॅम - ₹13,93,500
18 कॅरेट सोन्याचा भाव
1 ग्रॅम - ₹11,402
8 ग्रॅम - ₹91,216
10 ग्रॅम - ₹1,14,020
100 ग्रॅम - ₹11,40,200
प्रमुख शहरांतील सोन्याचे दर
मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, केरळ आणि पुणे येथे 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹15,202, तर 22 कॅरेट सोन्याचा दर ₹13,935 आहे.
दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर ₹15,217 आणि 22 कॅरेट सोन्याचा दर ₹13,950 आहे.
वडोदरा आणि अहमदाबादमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर ₹15,207, तर 22 कॅरेट सोन्याचा दर ₹13,940 आहे.
दरम्यान, सोन्याच्या दरातील ही घसरण ग्राहकांसाठी खरेदीची संधी ठरू शकते. मात्र, प्रत्यक्ष दागिन्यांच्या किमतीत मेकिंग चार्ज, GST आणि इतर शुल्कांचा समावेश असल्याने अंतिम किंमत यापेक्षा अधिक असू शकते.