- गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठी भेट; खा. नारायण राणे, मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश
मुंबई : 'सावंतवाडी एक्स्प्रेस'मुळे (Sawantwadi Express) मुंबई आणि कोकणातील रेल्वे जोडणी अधिक सक्षम होऊन कोकणच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल. सक्षम संपर्क व्यवस्था ही विकासाची गुरुकिल्ली असून, या रेल्वे सेवेमुळे कोकणच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी 'सावंतवाडी एक्स्प्रेस' रवाना झाली. या गाडीसाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार नारायणराव राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. (Sawantwadi Express)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १८ वर आयोजित मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेसच्या शुभारंभ कार्यक्रमास केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईत वास्तव्यास असलेल्या कोकणवासीयांसह कोकणात जाणाऱ्या सर्व प्रवाशांना या रेल्वे सेवेचा मोठा लाभ होणार आहे. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी सुरू झालेली सावंतवाडी एक्स्प्रेस (Sawantwadi Express) ही कोकणवासीयांसाठी मोठी भेट आहे. (Sawantwadi Express)
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना झालेली मारहाण अत्यंत चुकीची मुंबई : गणेशोत्सव अधिक पारंपारिक आणि ...
कोकणाला निसर्गसौंदर्य, विस्तीर्ण समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा वारसा लाभला आहे. जलद आणि सुलभ दळणवळण सुविधांमुळे कोकणातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी अधिक सहज उपलब्ध होतील. या रेल्वे सेवेमुळे स्थानिक पर्यटन व्यवसाय, हॉटेल उद्योग, वाहतूक सेवा आणि रोजगाराच्या संधींना प्रोत्साहन मिळेल. मुंबई आणि कोकणातील संपर्क वाढल्यामुळे कोकणच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळणार असून, आता कोकणचा विकास थांबणार नाही, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. मुंबईतील रेल्वेच्या जागांवरील अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही करताना तेथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांच्याकडे केली.
मुंबईतील लोकल फेऱ्यांची संख्या साडेतीन हजार करणार - रेल्वेमंत्री
- मुंबई उपनगरीय रेल्वेची क्षमता वाढविण्यासाठी सुमारे १८ हजार कोटी रुपयांची विविध कामे सुरू आहेत. सध्या दररोज धावणाऱ्या सुमारे ३ हजार २०० लोकल फेऱ्या आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणातून २०३० पर्यंत ३ हजार ५०० पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आहे, असे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
- प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन यंदा ३५० विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. गरज भासल्यास आणखी २० विशेष गाड्या चालविण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने केली आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी करण्यास रेल्वेचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे वैष्णव यांनी नमूद केले.
- मुंबई रेल्वे नेटवर्कच्या विस्तारासाठी नियोजनबद्ध पद्धतीने विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. जोगेश्वरी येथे पाच नवीन फलाट आणि दोन पिट लाइन, दादर येथे एक अतिरिक्त फलाट, तर वसई रोड परिसरात सहा फलाट, तीन पिट लाइन आणि पाच स्टेबलिंग लाइन उभारण्यात येत आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे चार नवीन फलाट आणि दोन पिट लाइन विकसित करण्यात येणार आहेत. अनेक फलाटांचा विस्तार करून ते १५ डब्यांच्या गाड्यांसाठी सक्षम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- मुंबईतील विद्यमान रेल्वे व्यवस्था विश्वासार्ह असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तिचे उन्नयन करण्यात येणार आहे. लोकल प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी प्रत्येक लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे असावेत, असा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाने २३८ वातानुकूलित लोकल रेकच्या निर्मितीचे आदेश दिले आहेत. या निर्मिती प्रक्रियेत मॉडर्न कोच फॅक्टरी आणि रेल कोच फॅक्टरी यांचा समन्वय राहणार आहे. नवीन वातानुकूलित लोकलची पहिली गाडी २०२७ मध्ये उपलब्ध होईल, तर २०३० पर्यंत सर्व २३८ रेकची निर्मिती आणि पुरवठा पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.
नवी दिल्ली : रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukrain) दरम्यान गेल्या काही काळापासून सुरू असलेला भीषण संघर्ष थांबवण्यासाठी भारत पुन्हा एकदा शांततेचा दूत म्हणून पुढे ...
मुंबई-पुणे बुलेट ट्रेन सुरू करणार - अश्विनी वैष्णव
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गालगत रेल्वेमार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार समृद्धी महामार्गालगत पूर्व आणि पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गांचे आरेखन करण्यात येणार आहे. या नवीन रेल्वेमार्गांमुळे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक परिसरातील संपर्क व्यवस्था अधिक सक्षम होईल. मालवाहतूक आणि प्रवासी सेवांची क्षमता वाढल्याने राज्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला गती मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. प्रकल्पांतर्गत सुमारे ४५५ किलोमीटरचे पिअर्स आणि ३६५ किलोमीटरचे व्हायाडक्ट पूर्ण झाले आहेत. वांद्रे-कुर्ला संकुल ते ठाणे दरम्यानच्या भूमिगत मार्गामध्ये भारतातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याचा समावेश आहे. या बोगद्याच्या कामासाठी विक्रोळी आणि घणसोली येथून टनेल बोअरिंग मशीनद्वारे काम सुरू आहे. मुंबई-पुणे बुलेट ट्रेन कॉरिडॉर हा महाराष्ट्राच्या भविष्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय असल्याचेही वैष्णव यांनी नमूद केले.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी देशभरात पायाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत. या संकल्पपूर्तीसाठी सर्वांनी एकत्रितपणे योगदान द्यावे, असे आवाहनही केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांनी केले.
नागपूर : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा आणि आगामी सणांचा उत्साह शिगेला पोहोचला असून गणेश मंडळे तयारीला लागली आहेत. सणासुदीच्या याच ...
सावंतवाडी एक्स्प्रेसविषयी
मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई आणि सावंतवाडी रोड दरम्यान ही नवीन दैनंदिन एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहे. उद्घाटनपर विशेष गाडी क्रमांक ०१००१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रवाना होऊन दुसऱ्या दिवशी मध्यरात्री २ वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबेल. या गाडीमध्ये एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, दोन वातानुकूलित द्वितीय श्रेणी, तीन वातानुकूलित तृतीय श्रेणी, चार शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी, एक द्वितीय आसन श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन असणार आहे. (Sawantwadi Express)