मंडळातील किमान ८ ते १० स्वयंसेवकांना मिळणार प्रशिक्षण
मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांनी उत्सव साजरा करताना कोणती काळजी घ्यावी, आपत्ती उद्भवू नये यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, आपत्ती उद्भवलीच तर आपत्कालीन व्यवस्थापन कसे करावे, याबाबत महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीगणेशोत्सव मंडळातील किमान ८ ते १० स्वयंसेवकांना एकदिवसीय प्रथम प्रतिसादक आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
Vishakha Raut : विशाखा राऊत यांचे महापालिका सदस्यत्व रद्द होणार?
आयुक्तांनी नगरविकास खात्याला पाठवले पत्र, न्यायालयानेही याचिका फेटाळली
पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढवता येणार नाही ?
मुंबई ( विशेष प्रतिनिधी ) : ...
श्रीगणेशोत्सवात दर्शनासाठी होणारी गर्दी, विद्युत अपघात, आग, आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळावी याबाबत प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच प्रथमोपचार व सीपीआर बाबतही प्रात्यक्षिकांद्वारे माहिती देण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या सर्व २६ प्रशासकीय विभागांतील (वॉर्ड) हे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी प्रशासकीय विभाग (वॉर्ड) कार्यालयाकडून सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांशी समन्वय साधण्यात येणार आहे.
यंदाचा श्रीगणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी महानगरपालिकेने नियोजन व कार्यवाही सुरू केली आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून विविध सेवा-सुविधा पुरवितांना पर्यावरणपूरक शक्य तितक्या बाबींचा अवलंब केला जात आहे. मुंबईतील श्रीगणेशोत्सव महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. लाखो भाविक, पर्यटक या उत्सवासाठी मुंबईत येतात. विविध सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी देशभरातून भाविक मुंबईत येत असतात. त्यामुळे मंडळांच्या उत्सव मंडपांमध्ये, परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते.
अशावेळी गर्दीचे नियोजन कसे करावे, कोणतीही दुर्घटना होवू नये यासाठी कोणती काळजी घ्यावी, प्रसाद वाटप करताना कोणती दक्षता घ्यावी, आपत्कालीन कार्यवाही कोणती व कशी असावी, याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक श्रीगणेश मंडळातील किमान ८ ते १० स्वयंसेवकांना एकदिवसीय प्रशिक्षण दिले जाणार आहे. आपत्कालीन व्यवस्थापनात नागरी सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे.
या प्रशिक्षणात मुंबई महानगरपालिका आपत्कालीन व्यवस्थावन विभागाचे अधिकारी, मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन विभागाचे अधिकारी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, पोलिस अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांनी महानगरपालिकेच्या या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.