मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून अनेक भागांत पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावत असल्या तरी सर्वदूर पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, आज विदर्भातील काही जिल्ह्यांसह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Maharashtra Weather Update)
आज नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि अमरावती या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांतही काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update)
मुंबई : कोकणातील प्रवाशांची दीर्घकाळापासूनची मागणी आता पूर्ण होणार आहे. मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी रोड दरम्यान ...
याशिवाय नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. राज्यातील उर्वरित भागात ऊन-सावल्यांचा खेळ सुरू राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी हलक्या पावसाचा शिडकावा होऊ शकतो. (Maharashtra Weather Update)
उद्या विदर्भात ऑरेंज अलर्ट :
उद्याच्या हवामानाबाबत विदर्भातील अमरावती आणि गोंदिया जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. दुसरीकडे नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांत हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update)
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे माजी ग्रुप कॅप्टन आणि वीर चक्र विजेते अभिनंदन वर्धमान पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 2019 मध्ये पाकिस्तानच्या F-16 लढाऊ ...
कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाला पोषक स्थिती :
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम झारखंड आणि परिसरातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र ईशान्य मध्य प्रदेश आणि परिसरात पोहोचले आहे. या प्रणालीशी संबंधित चक्राकार वाऱ्यांची स्थिती समुद्रसपाटीपासून सुमारे ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत विस्तारली आहे. पुढील १२ तासांत हे ठळक कमी दाबाचे क्षेत्र कमकुवत होऊन कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update)
पुढील २४ तासांत ही हवामान प्रणाली दक्षिण उत्तर प्रदेश आणि उत्तर मध्य प्रदेशातून पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याचा अंदाज आहे. तसेच सध्या मॉन्सून आसही या कमी दाबाच्या क्षेत्रातून पुढे बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेली आहे. (Maharashtra Weather Update)
वायव्य उत्तर प्रदेशापासून बांगलादेशापर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून तो ईशान्य मध्य प्रदेश, झारखंड आणि गंगेच्या पश्चिम बंगालवरील चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीतून जात आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update)






