Wednesday, September 2, 2026

Santosh Pandit Arrest : पुण्यात मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा! प्रसिद्ध रीलस्टार संतोष पंडितला पोलिसांनी घेतलं ताब्यात; प्रकरण काय?

Santosh Pandit Arrest : पुण्यात मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा! प्रसिद्ध रीलस्टार संतोष पंडितला पोलिसांनी घेतलं ताब्यात; प्रकरण काय?

पुणे : पुण्यात मध्यरात्रीच्या सुमारास प्रसिद्ध रीलस्टार संतोष पंडित यांना पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. रात्री सुमारे १ वाजता झालेल्या या कारवाईमुळे सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, पोलिसांकडून या कारवाईमागील संपूर्ण कारणाबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. (Santosh Pandit Arrest)

संतोष पंडित यांच्याविरोधात नुकताच डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि अश्लील भाषेचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी भाजपचे स्थानिक माजी नगरसेवक सुनील पांडे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संतोष पंडित आणि त्यांच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला. (Santosh Pandit Arrest)

'राजकारण एक्सप्रेस' व्हिडिओमुळे वाद :

मिळालेल्या माहितीनुसार, 'राजकारण एक्सप्रेस' या सोशल मीडिया पेजवरून एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला होता. लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा दावा या व्हिडिओमधून करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये मंत्र्यांवर टीका करताना अत्यंत आक्षेपार्ह भाषेचा वापर झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. (Santosh Pandit Arrest)

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत संतोष पंडित यांना मध्यरात्री ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. ही कारवाई याच प्रकरणाच्या अनुषंगाने करण्यात आली आहे का, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण मिळालेले नाही. (Santosh Pandit Arrest)

मध्यरात्री पोलिसांच्या कारवाईचा आरोप :

दरम्यान, संतोष पंडित यांनी पोलिसांच्या मध्यरात्रीच्या कारवाईबाबत गंभीर आरोप केले आहेत. रात्री सुमारे १ वाजता पोलीस थेट घरी आले आणि खोलीचे दार तसेच खिडक्या जोरजोरात वाजवल्याचा दावा त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे पुण्यातील राजकीय आणि सोशल मीडिया वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या तपासानंतर या कारवाईमागील नेमके कारण आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया स्पष्ट होणार आहे. (Santosh Pandit Arrest)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >